Maratha Reservation News: मराठा समाजाला (Maratha Reservation Updates) कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी होत असताना एक अतिशय मोठी बातमी आली आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्यातील 1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी केवळ 4 हजार 160 अभिलेखांवर कुणबी नोंद आढळली आहे. याचा अर्थ असा की, निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर विभागीय आयुक्तांकडे ही आकडेवारी करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता, सरकारनं जीआर बदलला नाही तर 99 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्यच दिसतंय. मराठा समाज अभ्यासकांच्या दाव्यानुसार, सध्या मराठवाड्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाख इतकी आहे. मात्र गेल्या 5 वर्षांत केवळ 632 जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचं दिसून आलं आहे. 


मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतील हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा तपासणीनंतर विभागीय आयुक्तांकडे सादर झालेली आकडेवारी पाहता…



  • मराठवाड्यातील 1967 पर्यंतच्या 34 लाख अभिलेखांपैकी केवळ 4160 वर कुणबी नोंद आढळली 

  • सरकारने जीआर बदलला नाही तर 99 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणे अशक्यच

  • गेल्या 5 वर्षांत केवळ 632 जणांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले. 

  • मराठा समाज अभ्यासकांच्या दाव्यानुसार, सध्या मराठवाड्यात या समाजाची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाखांवर 


दरम्यान, महसुल शैक्षणिक अभिलेखांची तपासणी करु शकले. त्यापैकी केवळ 4960 अभिलेखात कुणबी नोंद आढळली, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी यांनी दिली. याचा अर्थ असा की. निजामकालीन वंशावळीच्या आधारे सरसकट मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ होणार नाही


पाहा व्हिडीओ : Kunbi Caste Certificate देणं निव्वळ अशक्य?  मराठवाड्यातील Maratha समाजाच्या मागणीला मोठा धक्का?



अभिलेखांच्या तपासणीनंतर केवळ 4160 कुणबी नोंदी 


मराठवाड्यातील मराठा समाजाला निजाम राजवटीतील कागदपत्रांच्या आधारे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. निजाम राजवटीत मराठवाड्यात पाच जिल्हे होते. ते पाच जिल्हे म्हणजे, बीड, औरंगाबाद, उस्मानाबद, परभणी आणि नांदेड. या पाच जिल्ह्यांतले जवळपास 33 लाख 98 हजार अभिलेख तपासले गेले आहेत. हे वृत्त दैनिक दिव्य मराठीनं प्रकाशित केलं आहे. त्यांच्याशी बोलत असताना विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी सांगितलं की, 33 लाख 98 हजार अभिलेखांच्या तपासणीनंतर त्यापैकी केवळ 4160 नोंदी या केवळ कुणबी समाजाच्या असल्याचं आढळलं आहे. तसेच, विभागीय आयुक्तांनी जिल्हावारही आकडेवारी सांगितली आहे. औरंगाबादेत 24, जालना 356, बीड 851, परभणी 2660, हिंगोली 11, उस्मानाबाद 101, लातूर 45 आणि नांदेडमध्ये 51 अशा नोंदी अभिलेखांवर आढळल्या आहेत.