कोल्हापूर : "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं," अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे."
कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाच्या या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.
आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांचं मत समजलं पाहिजे : शाहू महाराज
मूक आंदोलनात सहभागी झालेल्यांना संबोधित करताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे."
"जनतेमध्ये, समाजात नाराजी वाढली होती. संभाजीराजे यांनी रायगडावरुन घोषणा केल्यानंतर आम्ही सौम्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्राने एकमुखाने समोर गेलं पाहिजे. हा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे, आता दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. राज्य सरकार या मुद्द्यावर सकारात्मक आहे. जे योग्य आहे ते मराठा समाजाला मिळेल, असं शाहू महाराज यांनी सांगितलं.
"मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे हे पाहिलं पाहिजे. शाहू महाराजांनी 125 वर्षांपूर्वी आरक्षण दिलं आहे. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आरक्षण देण्यात आलं होतं. आता यामध्ये वंचित मराठा समाजाला समावेश व्हायला हवा. शिक्षण संस्था, साखर कारखाने आपल्याकडे जास्त आहेत. तिथे तरुणांना संधी मिळायला हवी. कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेऊ नका. आज एकत्र आला आहात. खचून जाऊ नका, सर्वांनी एकत्ररित्या पुढे जायला हवं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ देऊ नका, असा सल्ला शाहू महाराज यांनी दिला.
शाहू महाराजांनी आरक्षण देताना खूप अडचणी आल्या. त्यांच्या 48 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी 28 वर्षे चांगलं कार्य करुन दाखवलं. म्हणून हा समाज आपल्याला पाहिला मिळतं आहे. हा समाज जोमाने पुढे सरकायला हवा. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं, असं छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं