मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय. आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय. चर्चेची आजही तयारी आहे. चर्चा करण्यासाठी येणाऱ्यांना अडवणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आलीय. समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे.


 माजी न्यायाधीश शिंदे समितीचे सदस्य आणि मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या गायकवाड समितीचे तत्कालीन अध्यक्ष  उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला समिती सदस्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील
शंभूराज देसाई, दादा भुसे, दीपक केसरकर दिलीप वळसे पाटील, नरेंद्र पाटील, योगेश कदम उपस्थित आहे. 


बैठकीत काय होण्याची शक्यता?



  • सुप्रीम कोर्टात पुन्हा जाण्यासाठी गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींचा पुन्हा एकदा आज आढावा होण्याची शक्यता

  • त्याच सोबत माजी  न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचे सर्वेक्षण याचाही होणार आज आढावा

  • सारथी संस्थेसह मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या उपायोजनांचाही आज आढावा घेतला जाईल

  • यामध्ये आणखी काही नवीन तरतुदी करण्याची शक्यता जेणेकरून मराठा समाजाचा रोष कमी होऊ शकेल

  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आज पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल


राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा


मराठा आरक्षणाचं लोण राज्यभरात पसरत असतांना आता मुंबईतही आंदोलनाची धग तीव्र होतांना दिसत आहे. राज्यभरात सर्वपकाक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी होत असतांना आता मुंबईतही आमदार-खासदारांना फिरू न देण्याचा इशारा सकल मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.  मुंबईत आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक  पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्कमक तोडगा काढण्याचा निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून मुंबईतही राजकीय कार्यक्रम उधळून लावण्याची घोषणा केली आहे. तसेच स्वतःच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ही याबाबत सूचित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राजकीय कार्यकर्तेही मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अराजकीय भूमिका घेऊन आंदोलनात उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे.


हे ही वाचा :


मराठा आरक्षण पेटलं! मराठवाड्यात 12 बस फोडल्या, आष्टीत तहसीलदाराची गाडी पेटवली