मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात. बीडमध्ये सुरु असलेल्या जाळपोळीवरुन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आंदोलकांना इशारा दिला. जाळपोळीची घटना घडल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. तर सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा जरांगेंना संशय आहे.
मनोज जरांगेनी आवाहन केले आहे की, माझ्या मते मराठा समाज मी सांगेल ते काम करतोय. जाळपोळ करू नका उद्रेक करू नका,हे कोण करतेय ही शंका असो अथवा नसो. सर्वाना आवाहन करतो मला कोणतीही जळपोळीची बातमी आली तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. हे थांबवलं नाही तर मला नाईलाजाने निर्णय जाहीर करावा लागेल.
.कठोर कारवाई करण्याचे निर्देश
मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पोलिसांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला राज्यातले सर्व जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख उपस्थित होते या बैठकीत पोलीस महसंचालक यांनी दिवसभराच्या घडामोडींचा आढवा समोर ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत. या समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरु आहे.तसेच बैठकीमध्ये आंदोलनादरम्यान मालमत्तेचा आणि जीवितहानी करणार यांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन
मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरू आहे. बीडमध्ये काल झालेल्या आंदोलनानंतर जमावाने बीड बस स्थानकातील एक ही एसटी फोडायची शिल्लक ठेवली नाही. सोमवारी जमावाने आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बस स्टॅन्डमध्ये आला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. या सर्व एसटी जमावाने फोडल्या
मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत असल्याची शंका
घर जाळणं, त्यातून चो-या करण्याचा उद्देश या समाजकंटकांचा आहे. जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात. या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या करत आहेत. गुप्तचर यंत्रणा यावर काम करत आहेत. मुख्यमंत्र्याच्या उपस्थित झालेल्या बैठकीत गुन्हे दाखल करा आणि त्यांना अटक करा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल तर अडचण नाही पण राज्यात हिंसक वातावरण तयार होत असेल तर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :