Manoj Jarange Patil on Chhgan Bhujbal : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी मनोज जरांगे पाटील लीन झाले. पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना खुलं आव्हान दिलं आहे. 


नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशाराच जरांगेनी भुजबळांना दिला आहे. भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका. त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, मनोज जरांगेंनी म्हटले आहे. 


नाशिक लोकसभेत भुजबळ उभे राहिले तर... 


मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेना प्रश्न विचारला असता मराठा समाजाने राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगे पाटील उद्या नाशिक दौऱ्यावर


दरम्यान, नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा असतानाच मनोज जरांगे पाटील उद्या (दि. 08) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे नाशिक राजकीय वातावरण तापणार असून मनोज जरांगे पाटील नाशिकमध्ये काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


सकल मराठा समाज छगन भुजबळांविरोधात आक्रमक


शनिवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाने पत्रकार परिषद घेत छगन भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. भुजबळांना उमेदवारी देऊन पायावर धोंडा मारून घेऊ नका. छगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात आहेत. भाजप म्हणते सर्व्हेवर चालतो, पण एक देखील माणूस म्हणणार नाही की, भुजबळ यांना उमेदवारी द्या. भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तुम्ही मराठ्यांना डिवचण्याचे काम करत आहात, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार? भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता


Chhagan Bhujbal : लोकसभेवरून राजकारण तापलेले असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोनद्वारे रेकी? पोलीस बंदोबस्त वाढवला