मुंबई: मराठा आंदोलनाविरोधात (Maratha Reservation) याचिका करणाऱ्या गुणरत्न सदवर्ते यांना (Gunratna Sadavarte) दुसऱ्या खंडपीठाकडे दाद मागण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मुंबईतील आंदोलनाला (Mumbai Protest) विरोध करत याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात जाण्याचे निर्देश दिले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र सदावर्ते यांनी जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. जरांगेंच्या प्रस्तावित आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टातील मूळ खंडपीठाने नकार दिला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठानं प्रकरण न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी वर्ग केलं. काही कारणास्तव या याचिकेवरील सुनावणीस न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नकार दिला. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंना दुसऱ्या खंडपीठात दाद मागावी लागणार आहे.
मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी 20 जानेवारीपासून जरांगे यांनी आंतरवाली सराटीमधून पायी दिंडी काढली आहे. याच पायी दिंडीचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, याच मुंबई आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला होता. परंतु, जरांगे आपल्या मुंबई आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. आता कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार आणि मराठा आरक्षण घेऊनच येणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. तसेच, सरकारला आता आम्ही एक तास देखील वाढवून देणार नसल्याचे सुद्धा जरांगे म्हणाले आहेत.
आंदोलनाचा चौथा दिवस...
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा आजचा चौथा दिसव आहे. आज दुपारच जेवण कोरेगावं भीमा येथे करण्यात आले. तर, रात्री चंदननगर येथे मुक्काम केला जाणार आहे. उद्या परत सकाळी 10 वाजता जगताप डेअरी डांगे चौक येथून निघाल्यावर लोणावळा येथे मुक्काम केला जाणार आहे. तसेच 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: