Manoj Jarange Patil Wife : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसण्याची ही पहिलीच वेळ नाही. जरांगे यांच्या उपोषणाबद्दल त्यांची पत्नी सौमित्रा जरांगे (Saumitra Jarange) यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. "खूप दुःख वाटत आपण जेवतो पण तिथे आपला माणूस उपाशी असतो. किती दिवस आपले पती सलाईनवर राहतील सरकार ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. मराठा समाजाला विनंती आहे की, छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी कुठेही गालबोट लागु नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही सौमित्रा जरांगे यांनी केले.
'किती दिवस असच सलाईनवर राहणार, सरकारने अंमलबजावणी करावी'
मनोज जरांगे यांच्या पत्नी म्हणाल्या, "ते मान टाकून देत होते तेव्हा मला भीती वाटत होती. काळजी आणखीही वाटत आहे. किती दिवस असच सलाईनवर राहतील, सरकारने लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर जेवण लवकर करतील.
पप्पा लवकरच आरक्षण घेऊन येतील, जरांगेंचा मुलगा काय म्हणाला?
पप्पा लवकरच आरक्षण घेऊन येतील त्यांनी लवकरात लवकर उपचार घ्यावेत, असे आम्हाला वाटत होतं त्यांनी सलाईन घेतल्यामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळाला. पप्पांच्या नाकातून होणारा रक्तस्राव किमान टाकत असताना खूप दुःख होत होतं. पप्पांनी उपोषण सोडायला पाहिजे होतं, पण सरकार त्याशिवाय गांभीर्यने घेत नाही. त्यामुळे ते उपोषणाचा हत्यार उपसतात, असे जरांगे यांचा मुलगा शिवराज जरांगे म्हणाला.
आंदोलन स्थळी भेटायचं नाही, मुलीला जरांगेंनी काय सांगितलं?
पप्पांनी आंदोलन स्थळी भेटायचं नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही जात नव्हतो त्यांचा शब्द आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मला खूप भीती वाटते पप्पांची तब्येतीबद्दल त्यामुळे मला रडायला येतं. सरकारने लवकरात लवकर आणि गांभीर्याने दखल घ्यावी जेवढ्या लवकर अधिवेशन घेता येईल कायदा करावा, अशी प्रतिक्रिया पल्लवी जरांगे हिने व्यक्त केली.
आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे
कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना नवं आरक्षण असं सांगणं चुकीचं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करावीच लागेल, असे मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा करावाच लागेल. ईसीबीसीचं आरक्षण दीड वर्ष झालं. राज्यभर निवडी झाली, पण ते आरक्षण गेले. नियुक्ती द्या म्हणून आणखी आंदोलन सुरु आहे. आमचं हक्काचं ओबीसीचं आरक्षण केंद्रात आणि राज्यातही हवेय, असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Maratha Reservation: 40 टक्के लोकांचा मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय, विनोद पाटलांची प्रतिक्रिया