जुन्नर, पुणे : 19 तारखेला शिवनेरीवर (Shivneri Fort) शिवजयंती सोहळा  (Shiv Jayanti)जल्लोशात साजरा करण्यात येणार आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यावर्षी हा सोहळा लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी  (Pune News)  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साडेनऊ वाजता शिवनेरी गडावरील कार्यक्रमास सुरुवात होते. मात्र यावेळेस हा कार्यक्रम लवकर सुरु करण्यासाठी आणि साडेनऊ वाजता संपविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  हा कार्यक्रम संपला की लोकांना दहा वाजल्यापासून गडावर सोडण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.   


19 तारखेला शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. अकराशे पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


शासकिय कार्यक्रम लवकर संपवणार आहे. त्यामुळ  दहा वाजल्यानंतर  शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी.गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलंय. दरवर्षी या सेभेचे ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. 


 जुन्नर शहरात आजपासून ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत (Pune News) छत्रपती शिवाजी महाराज (Shiv Jayanti) यांच्या 394व्या जयंतीनिमित्त राज्याचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 'चे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्रि मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. विविध किल्ल्यांची चढाई करत स्वत:ला आव्हान द्यावे - किल्ले हडसर, निमगिरी - हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर - निमगिरी - हनुमंतगड - नाणेघाट - जिवधन येथे गिर्यारोहण  हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.        


इतर महत्वाची बातमी-