Manoj Jarange Patil : मराठ्यांच्या सापडलेल्या कुणबी नोंदी रद्द करा, असे म्हणत आहेत. यावरून हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे की नाही हे समजते. मराठा नेत्यांनी आता डोळे उघडावेत. शेकडे वर्षाच्या नोंदी रद्द करा म्हणतात. 70 वर्षे खोटं बोगस आरक्षण खाल्ल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला. 


जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही आंदोलन उभं केलं म्हणून तुम्ही तिथे आंदोलन होतं करत आहात का? आम्हाला खिंडीत पकडून डाव साधत आहात. मी येत्या निवडणुकीमध्ये 9 मंत्री पाडणार आहे.13 तारखेनंतर त्यांची नावे सांगतो असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. 


माधव पॅटर्न मी सुरू केला का?


जरांगे पाटील म्हणाले की जातीवाद आम्ही सुरू केला म्हणता, तर माधव पॅटर्न मी सुरू केला का? प्रतिमोर्चा कोणी काढला? कोणी जातीवाद केला? अशी विचारणा त्यांनी केली. मी आरक्षण मागतो म्हणून जातीवादी आहे का? महाज्योती चालते, बार्टी चालते आणि सारथीची पोर उपोषणाला बसली आहेत. शहागडमध्ये कार्यालय टाकू म्हटलं. मात्र, येवलेवाल्यांनी तिथेच आंदोलन सुरू केली. आता नाही का जातिवाद? अशी विचारणा यांनी केली. 


नोंदी रद्द करण्याची मागणी आम्हाला चालणार नाही 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसी नेते एकत्र आले, तर की मला पण दुखत नाही. मात्र, नोंदी रद्द करा अशी मागणी  आम्हाला चालणार नाही. कुणबी मराठे एकच आहेत ते लक्षात घ्या, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. कितीही बदनाम केले, तरी मागे हटू नका. नोंदी रद्द करा म्हणतात ते सहन केले जाणार नाही.  


छगन भुजबळांवर जोरदार टीका


जरांगे यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली. जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवाव्यात हा येवल्यावाल्यांचा प्लॅन आहे. मात्र, मराठा एक आहे सिद्ध झालं आहे. प्रत्येकाला कळतं की मी इथे मराठ्यांच्या लेकरासाठी लढत आहे. हाकेंवर बोलणार नाही कारण त्याचा बोलवता धनी तो असल्याची टीका जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली.


पाटील म्हणाले की, मी माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. मात्र, तुम्ही ओबीसी दबावाला बळी पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते. तुम्ही सरकारकडून फूस लावता त्यांना आणि आंदोलन तुम्हीच उभे करता. मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 


तो येवला वाला चाबरा आहे, त्याला मी राजकीय आयुष्यातून उठवेन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. गाड्या पुरवल्या जातात, आमच्या आमच्यामध्ये वाद लावून दिले जातात. लोकांना कळस सुद्धा नाही. पडलेली राज्यातील गँग साथ देत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या