Manoj Jarange Patil Latest News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहे. सरकारने दडपशाही सुरू केलीय, तीन-चार दिवस बघु, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. असं 8-9 तारखे पर्यत समाजाने शांत रहावे, असं आवाहन जरांगेनी केलं आहे. महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ल्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावर हल्ला करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप जरांगेनी केला आहे.


महिला कार्यकर्त्यांच्या आडून हल्ल्याचा डाव : जरांगे


'फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आहे, हा प्रयोग संभाजीनगरवरून होणार होता. महिला कार्यकर्त्यांच्या आडून, एवढ्या खालच्या दर्जाला जाणे गृहमंत्र्याचं काम नाही, तुम्हाला हे शोभत नाही', असं म्हणत जरांगेनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केलं आहे. मी हॉस्पिटल मधून बाहेर का आलो? दवाखान्यात ऍडमिट असल्यावर चौकशी होत नाही, लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम SIT च्या चौकशी साठी बाहेर आलो, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी बीड जिल्ह्यातील वानगाव फाटा येथील बैठकीआधी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं आहे. 


फडणवीसांमध्ये मराठा द्वेष ठासून भरलेला : जरांगे


फडणवीस यांनी पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यात मराठा द्वेष ठासून भरलेला आहे. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड काढले जात आहेत. पोलीस बोर्ड काढत आहेत, बोर्ड का काढलेत, त्यात गोळ्या घाला लिहिले आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारला आहे. बोर्ड काढल्यामुळे लोक नाराज होऊ लागलेत, तुम्हाला तुमचे बोर्ड तर, लावावे लागतील ना, असंही जरांगेनी म्हटलं आहे. 


गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा नवीन डाव


मराठ्यांनी गावागावात तालुक्यात ग्रुप बनवून आपापल्या घराला पोम्प्लेट चिटकावयाचं, 'माझ्या दारात यायचं नाही', असं त्यावर लिहायचं. घर-गाड्यांवर पॅम्प्लेट चिटकवण्याची मोहीम सुरू करा. सरकारने गुन्हे दाखल करण्याचा नवीन डाव सुरू केलाय, सरकारचा हा शेवटचा डाव आहे, तो म्हणजे गुंतवणे. पोलीस भरती आणि शिक्षक भरती आली आणि लगेच लोक कोर्टात गेले. 


'गृहमंत्री पोलिसांचे कान फुकत आहेत'


चार महिन्यांपूर्वी गुन्हे केलेली मुले उचलू लागलेत. आत्त्या जशी कान फुकते, तसे गृहमंत्री पोलिसांचे कान फुकत आहेत. आमच्या मागे तुतारी आहे म्हणता आणि फडणवीस सांगतात पवारांना आंतरवलीत रस्ता बदलावावा लागला. अगोदर उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. निवडणुकीत एकट्या बीड जिल्ह्यात 3400 उमेदवार उभे राहणार आहेत, मग काय डांबरीवर बॅलेट पेपर अंथरणार का, असा प्रश्न जरांगेनी उपस्थित केला आहे.


8-9 मार्चपर्यंत तारखेपर्यत वाट बघणार, जरांगेना इशारा


राजकीय अजेंडा माझा नाही, फॉर्म कोणीही भरू शकतो, तो लोकशाहीचा अधिकार सर्वाना आमदार खासदार व्हावं वाटत. मी राजकीय मार्गात पडनार नाही, मी समाजाचा मालक नाही. 8-9-तारखेपर्यत वाट बघणार आहोत, नंतर आंदोलन करणार, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका, गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के आरक्षणाला आव्हान