जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छातीत दुखू लागल्याने रात्री त्यांच्यावर आंतरवालीतच उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे यांच्या छातीत दुखत असल्याने छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर तात्काळ आंतरवालीत पोहचले. जरांगे यांच्यावर रात्रीच तातडीने उपचार सुरु करण्यात आले. रात्री दहा आणि दीड वाजता जरांगे यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात कुठलाही धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी आंतरवालीतच त्यांच्यावर उपचार केले. ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत कळ आली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 


मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, त्यांना बरं वाटत असल्याने शुक्रवारी त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता. दरम्यान,  डिस्चार्ज मिळताच मनोज जरांगे पुन्हा आंतरवालीला पोहचले होते. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, रात्रीच अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्रास अधिक वाढल्याने त्यांच्यावर उपचार करणाऱ्या संभाजीनगरच्या डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे संभाजीनगरच्या डॉक्टरांचं पथक तात्काळ आंतरवालीत पोहचलं आणि जरांगे यांची तपासणी करण्यात आली. रात्री दहा वाजता पहिला इसीजी काढण्यात आला, ज्यात कोणताही धोका नसल्याचे समोर आले. त्यानंतर देखील डॉक्टरांचं पथक तिथेच थांबून होते. रात्री दीड वाजता पुन्हा दुसरा इसीजी काढण्यात आला आणि त्यात देखील कोणताही धोका नसल्याचे समोर आले. 


आता प्रकृती ठीक....


मनोज जरांगे यांची मध्यरात्री अचानक तब्येत बिघडली आणि त्यांच्या छातीत दुखू लागले होते. त्यांच्यावर खाजगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले आहेत. यावेळी त्यांचा एसीजी (ECG) काढण्यात आला.तर, एसीजी नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना रात्री उशिरा सलाईन लावण्यात आले आहेत. आता त्यांची  प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम...


सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. जोपर्यंत ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहेत. सध्या परीक्षा सुरु असल्याने आपण आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेला लढा सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. पुढील काही दिवस सरकारच्या भुमिकेकडे फक्त लक्ष ठेवा, त्यानंतर आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू असे अवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका, गुणरत्न सदावर्तेंकडून 10 टक्के आरक्षणाला आव्हान