Manoj Jarange Patil :  कोणताही नेता आला तरी त्याला ताण देऊ नका. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका हे मराठा समाजाच्या पोरांना माझं सांगण असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. गोंधळ घालणार असाल तर कोणी येणार नाही असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले. सहन होतंय तोवर सन्मान करा, जेव्हा आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट होईल तेव्हा बघू काय करायचं ते असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी  दिला. तुमच्यावर जबाबदारी आहे. कोणी गोधळ घातला तर बघाव लागेल असेही जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement


आम्ही सरकारला कोणतीही कागदपत्र देणार नाही


अभ्यासकांशी चर्चा केली आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही. सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो. सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असे जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही असेही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असे जरांगे म्हणाले. 


 रस्त्यात गाड्या लावू नका, मैदानात लावा


समुद्रात जाऊ नका, काही लागू शकेल कोणीही जाता कामा नये पाण्यात नाही तर घरी जा. एक एक माणूस महत्वाचा आहे असे जरांगे पाटील म्हणाले. रस्त्यात गाड्या लावू नका मैदानात लावा असेही जरांगे पाटील म्हणाले. आता बोलायला त्रास होत आहे. सावध राहा सरकारला दंगल घडवायची आहे  मी आधीच बोललो होतो असेही जरांगे पाटील म्हणाले. 


मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. आझाद मैदानावर सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहेत. आज खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर जाताना त्यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता. तसेच शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती. 


महत्वाच्या बातम्या:


फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? पत्रकाराच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले