Manoj Jarange Patil Beed :  राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात देखील पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेताच्या बांधावर पोहोचले आहेत.


बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. यात प्रामुख्याने आष्टी तालुक्याला पावसाने झोडपून काढलं. याच गावात आज मनोज जरांगे पाटील यांनी भेटी दिल्या. आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी कडा कारखेल खुर्द या ढगफुटी सदृश्य झालेल्या गावात जरांगे पाटील पोहोचताच महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पंचनाम्याचा कोणताही फार्स न करता शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे. दरम्यान याबाबत कृषी मंत्र्यांशी देखील बोलणे झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली.


सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषत: मराठवाड्यात मोठा पाऊस सुरु आहे. बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल दुपार पासून पावसाने उसंत घेतली होती मात्र आज सायंकाळी परत एकदा जोरदार पाऊस बरसलाय परभणी गंगाखेड पालम पूर्णा आदी तालुक्यात जोरदार पाऊस बरसला आहे ज्यामुळे ओढ्या नाल्यांना पुन्हा पुर आला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान या पावसामुळे होत आहे.







परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस


परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय. परभणीच्या मानवत तालुक्यांमध्ये या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा शेती पिकांचे नुकसान झाला आहे. मानवत तालुक्यातील देवलगाव आवचार भोगाव साबळे,ताडबोरगाव,मांडाखळी,पूर्णा तालुक्यातील लिमला पिंगळी सिंगणापूर,लोहगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झालं आहे. देवलगाव आवचार गावांमध्ये तर सर्वत्र 1 फुटापर्यंत पाणी साचले होते, तसेच देवलगाव अवचार येथील 33 केव्ही परिसरातही पाणीच पाणी झाले होते. काही देवलगाव अवचार भोगाव साबळे रस्त्यावरिल ओढ्याला पाणी आल्याने काही गावकरी गावातील रस्त्यावर अडकले होते मात्र पाणी उतरल्यानंतर हे गावकरी पुन्हा गावात परतले आहेत.








 



महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather Update : मुंबईवरचा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार, तुफान बरसण्याची शक्यता, मुंबईला ऑरेंज अलर्ट