Manoj Jarange Patil : आंतरवाली सराटी येथेच आंदोलनाचं ठिकाण असेल. शहागाड येथे लोकांच्या समस्या सोडवण्याचे एक ठिकाण म्हणून कार्यालय सुरु करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं. उपोषण सोडल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपण लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शाहगड येथे कार्यलाय सुरु करणार असल्याचं सांगितलं. "शंभूराजे यांनी सांगितलं सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून कामाला लागणार आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मागे हटत नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले. "
मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी जाणार असेल तर त्यात काय लबाडी आहे. शहागड येथे आम्हाला कार्यालय घ्यावं लागणार आहे. अंतरवाली सोडायचा विषय नाही. लोकांना त्रास होऊ नये. वर्दळ होईल म्हणून शाहागड येथे कार्यालय करायचं म्हणालो असं जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. राज्याच्या पातळीवरचे काम आता आजपासून सुरु आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.
मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही
माझ्यामुळे जर कोण निवडूण आले, असं म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा आहे. मी समाजासाठी लढत असल्याने तसं म्हणत असतील. टेबल वाजवणारे नाहीत म्हणून ते येत असतील असेही जरांगे पाटील म्हणाले. मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून खूप कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मी मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचं?
आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचं? कुणाला धक्का लागत नाही. मात्र, काही लोक सांगत नाहीत. जवळपास सगळे मराठे अरक्षणात गेलेत, राहिलेल्या लोकांना सोबत घेतलं पाहजे. नाही तरी आम्ही घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझा चित्रपटात जीव नाही तर आरक्षणात जीव असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. चित्रपट तयार करणाऱ्यांना शुभेच्छा. मला 8 दिवस उठता येत नाही, नंतर बघेल, मला चित्रपटात इंटरेस्ट नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.