Mohit Kamboj : मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे (Corruption) सगळे रेकॅार्ड तोडत आहे. पालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. त्याला कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे. एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, असा इशारा भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिला आहे. 


मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर मुंबई महापालिकेतील (BMC) अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कंबोज यांच्या ट्विटनं पालिकेतील तो अधिकारी नेमकं कोण? याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 






नेमकं काय म्हटलंय ट्विटमध्ये ? 


मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे. पालिकेतील ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचे सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला गेला असून याचे तोंड म्हणजे गटार आहे.  त्याला कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे, असे आवाहन मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. 






लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार 


मोहित कंबोज यांनी पुढे म्हटले आहे की, या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार आहे.  या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटमुळे सध्या मोठी खळबळ उडाली असून तो अधिकारी नेमका कोण याची जोरदार चर्चा सुरु आहे.    


आणखी वाचा 


राष्ट्रवादीमुळे लोकसभेत महायुतीला फटका, उत्तर प्रदेशचा दाखला देत छगन भुजबळांनी गणित मांडलं!