जालना : मुंबई आंदोलनावरून सोशल मीडियातून मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरणार असून, यासाठी जरांगे आजपासून 10 फेब्रुवारीपर्यत महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मनोज जरांगे हे आज आळंदी आणि मुंबई असा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. यासाठी आज आंतरवाली सराटीवरून 12 वाजता ते निघणार आहेत. याच दौऱ्यात मुंबईतील मराठा समाजबांधवांसोबत ते बैठक देखील घेणार आहे.


मनोज जरांगे पाटील यांचा दौरा...



  • 6 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे आंतरवालीहून 12 वाजता निघणार. शिक्रापूर मार्गे- चाकण आळंदी देवाची, आळंदी येथे नियोजित कार्यक्रमला सायंकाळी 6 वाजता हजेरी लावणार. तसेच आळंदी मुक्काम.

  • 7  फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे आळंदीहून चाकण मार्गे- खोपोली मार्गे- पनवेल मार्गे- कामोठे येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार. त्यानंतर नवी मुंबई मार्गे- चेंबूर मार्गे- शिवाजी मंदिर, दादर मुंबई येथे सायंकाळी 6 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार.

  • 8  फेब्रुवारी 2024 : दादर मुंबईतून- नाशिक मार्गे- सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी 11 वाजता नियोजित कार्यक्रम. त्यानंतर सान्हेर किल्याहुन छत्रपती संभाजीनगर मार्गे- आंतरवाली सराटी.

  • 9 फेब्रुवारी 2024 : आंतरवालीहून– भोगलगाव (जिल्हा-बीड) येथे सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर भोगलगावहून – बीड मार्गे- कोळवाडी (मांजरसुबा घाट) येथे दुपारी 12 वाजता नियोजित कार्यक्रमला उपस्थित राहणार. त्यानंतर कोळवाडीहून बीड - गेवराई मार्गे - आंतरवाली सराटी..

  • 10 फेब्रुवारी 2024 : आंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता महत्वाची बैठक व त्यानंतर मनोज  जरांगे पाटिल यांचे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.


जातीच्या जीवावर पैसे खाणाऱ्यांची पोटदुखी सुरु


दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मनोज जरांगे आपल्यावर टीका करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे. “काही 5-50 लोकांकडून होत असलेल्या सोशल मीडियावर टीकेला प्रत्युत्तर देणार नाही. कारण समाज माझ्या पाठीशी आहे. काही जणांना काही मिळालं नाही म्हणून त्यांचे हे प्रयत्न होत आहे. सुपारी घेऊन पक्षाला मोठे मानणारे स्वतःला शहाणे समजणारे माझ्यावर टीका करत आहेत. त्यांनी शहाणपणाची भूमिका घ्यावी, समाज एक झालेला आहे. समाजाची नाराजी घेऊ नका तुम्हाला जड जाईल. जातीच्या जीवावर पैसे खाणाऱ्यांची पोटदुखी सुरु आहे. बऱ्याचशा प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण करणार असल्याचे," जरांगे म्हणाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, पक्षासह 'त्या' नेत्यांची नावं उघड करणार; मनोज जरांगेंचा इशारा