Manoj Jarange Live : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात , मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट एका क्लिकवर

Manoj Jarange Mumbai March Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली, फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं.

मोसीन शेख Last Updated: 25 Jan 2024 05:38 PM
Manoj Jarange : फसवून झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange :  सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, कोर्टाचे कागदपत्रं असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे. 

Rohit Pawar : संविधानानं प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय, त्यांना मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही; रोहित पवारांच्या प्रतिक्रिया

Rohit Pawar :  मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मुंबईत पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीये. संविधानाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे युवावर्गाचं आंदोलन असून त्यांना कोणाही आझाद मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एबीपी माझाला दिली. 

Manoj Jarange Live : मराठा आरक्षण देणारच, काल अन् आजही तीच भूमिका; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले

CM Eknath Shinde On Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची प्रतिक्रिया आली आहे. सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. सरकार मराठा आरक्षण देण्याच्या मनस्थितीत काम करत आहे. आणि देत देखील आहे. कुठलेही आश्वासन न देता थेट मराठा समाजाशी संबंधित योजनांचे निर्णय घेतले जात आहे. ओबीसी प्रमाणे ज्या सुविधा आहेत, त्या देखील मराठा समाजाला देण्याचं प्रयत्न केले जात आहे. तर, मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार ठाम असून, कालही आमची तीच भूमिका होती आणि आजही तीच भूमिका असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


संपूर्ण बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...


https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-eknath-shinde-information-on-maratha-reservation-one-lakh-40-thousand-people-work-in-three-shifts-for-maratha-reservation-manoj-jarange-marathi-news-1250231

Manoj Jarange : ऊन, वाऱ्यात आमचेही हाल, फक्त मुंबईचे हाल होणार नाहीत, आझाद मैदानावर व्यासपीठ तयार

Manoj Jarange : ऊन, वाऱ्यात आमचेही हाल, फक्त मुंबईचे हाल होणार नाहीत, आझाद मैदानावर व्यासपीठ तयार


व्हिडिओ...


 


Manoj Jarange Live : मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, परवानगी नाकारतचा मनोज जरांगेंचा पवित्रा

Manoj Jarange Live : मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)आझाद मैदानातील (Azad Maidan)उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया दिली. कोण म्हणलं नाकारली, परवानगी दिलीय. न्यायालयाने दिलीय, आमचे वकील बांधवही कोर्टात चाललेत, असं मनोज जरांगे म्हणाले. मुंबईला जाण्याची हौस नाही, आरक्षण द्या, गावी जातो, असा पवित्रा  मनोज जरांगे यांनी घेतला. 


संपूर्ण बातमी...


https://marathi.abplive.com/news/mumbai/manoj-jarange-first-reaction-after-azad-maindan-police-denied-permission-for-maratha-reservation-protest-aarakshan-news-mumbai-1250182

मोठी बातमी! मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंन नोटीस; आंदोलनाबाबत सूचनाही केल्या

Maratha Reservation Mumbai March : मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर येत असून, मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार असल्याचे नोटीसमधून सांगण्यात आले आहेत. सोबतच, आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत त्यांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

Babanrao Taywade On OBC Reservation :ओबीसी समाजादेखील मुंबईकडे कूच करण्याची तयारीत : बबनराव तायवाडे

Babanrao Taywade On OBC Reservation :ओबीसी समाजादेखील मुंबईकडे कूच करण्याची तयारीत : बबनराव तायवाडे


पाहा व्हिडिओ!


Pune Mumbai Express Way:  जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात

Pune Mumbai Express Way:  जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आलंय. रॅपिड अॅक्शन फोर्सने दुतर्फा बॅरिकेडिंग लावलंय. सध्या आंदोलकांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये. 

Manoj Jarange : शिष्टमंडळ काय प्रस्ताव घेऊन आले तो वाचेन, त्यानंतरच निर्णय घेणार :मनोज जरांगे

Manoj Jarange : शिष्टमंडळ काय प्रस्ताव घेऊन आले तो वाचेन, त्यानंतरच निर्णय घेणार :मनोज जरांगे 


व्हिडिओ :


Navi Mumbai Police : भगवं वादळ नवी मुंबईत धडकणार, नवी मुंबई, पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी

Navi Mumbai Police : भगवं वादळ नवी मुंबईत धडकणार, नवी मुंबई, पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी


 


Manoj Jarange Live: समाजाला विचारल्या शिवाय कोणताही निर्णय नाही: मनोज जरांगे

Manoj Jarange Live : मराठा समाजाला विचारल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. शिष्टमंडळाशी चर्चा करतो आणि त्यांचे म्हणणे काय आहेत हे पाहतो. त्यांचा प्रस्ताव काय आहे हे पाहून, पुढचा निर्णय घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी जेवण करून घ्यावे आणि सर्व सोबत मुंबईकडे निघणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. 

Manoj Jarange Live : शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange Live : आंदोलनात असणाऱ्या लोकांना मदत करा, कोणाची गाडी बंद पडल्यास त्याला मदत करा. कुणाकडे डब्बा नसल्याचे त्याला जेवायला द्यावे. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी असणाऱ्यांची आमची जबाबदारी असेल. बाहेर कुणी काहीही केलं तरीही आम्हाला काही देणघेण नाही. 

Manoj Jarange Live : कोण कोण मराठ्यांच्या विरोधात जात आहे हे मला पाहायचं : मनोज जरांगे

 Manoj Jarange Live : मराठा समाजाचे 54 लाख नोदणी सापडल्या असून, त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. मराठा जिंकतो हे पुन्हा सिद्ध करून द्यायचे आहेत. मुंबईत गेल्यावर गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी. कोण कोण मराठ्यांच्या विरोधात जात आहे हे मला पाहायच आहे. आता एकजुटीने मला साथ द्या, आपल्याला मराठा आरक्षण मिळवायचे आहेत. 

 Manoj Jarange Live : उद्यापासून सर्वांना स्वयंसेवकाची भूमिका बजावायची: मनोज जरांगे

 Manoj Jarange Live : आपल्याला मुंबईला जायचं आहे. त्यामुळे उद्यापासून सर्वांना स्वयंसेवकाची भूमिका बजावायची आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. मात्र, याचवेळी शांततेत हे आंदोलन करायचं आहे. आंदोलनात कोणी विघ्नसंतोषी दिसत आहे का? यावर लक्ष ठेवा आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाका.


 

Manoj Jarange : समाजाशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाशी बोलणार, शिष्टमंडळाशी चर्चाच झालेली नाही

Manoj Jarange : समाजाशी चर्चा केल्यानंतर शिष्टमंडळाशी बोलणार, शिष्टमंडळाशी चर्चाच झालेली नाही


जर-तरला अर्थ नाही, मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा; शिष्टमंडळाच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

Manoj Jarange Live  : जर-तरला अर्थ नाही, मुंबईकडे गाड्यांचे तोंड करून ठेवा; शिष्टमंडळाच्या भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया


https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-reaction-to-government-delegation-on-maratha-reservation-otherwise-keep-vehicles-facing-mumbai-1250111

Maratha reservation Navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 15 हजार आंदोलकांच्या जेवणाची तयारी

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा आंदोलक आज मुक्कामाला येणार आहेत. या मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था  एपीएमसी मार्केट आवारात करण्यात आलेय. यासोबतच चार भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम राबवून नागरिकांना भाकरी चटणी ठेचा भाजी देण्याचे आवाहन देखील करण्यात आलेय. एपीएमसीत  जेवण बनवण्याची तयारी करत असून फळ बाजारात तब्बल  15 हजार आंदोलकांचे जेवण बनविण्यात येतेय.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलद कृती दल-बॉम्ब निकामी पथक तैनात

Manoj Jarange Mumbai Rally Live Updates : लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. जलद कृती दल आणि बॉम्ब निकामी पथकही तैनात करण्यात आले आहेत. 

जरांगेंच्या दबाव तंत्राला उत्तर देण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार: बबनराव तायवाडे

Manoj Jarange  : मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून, आता ओबीसी समाजाने देखील मुंबईकडे कूच करण्याची पूर्व तयारी सुरु केली आहे. मेळावे, सभा जनजागृती या माध्यमातून ओबीसी समाजाला जागृत करायचं काम सुरु झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. जरांगे यांनी सरकारवर दबाव तयार करण्यापेक्षा, सरकार काय करू शकते व काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे. त्यानुसार आपली भूमिका ठरवायला पाहिजे असा सल्ला बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांना दिला

Lonavala Maratha Tila : मराठा आंदोलकांच्या कपाळावर 'मराठा' टिळा, दररोज 10 हजार मराठ्यांना गंध

Lonavala Maratha Tila : मराठा आंदोलकांच्या कपाळावर 'मराठा' टिळा, दररोज 10 हजार मराठ्यांना गंध


पाहा व्हिडिओ!


सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप

सावळा गोंधळ! पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचा सर्वेक्षण; मराठा समाजात तीव्र संताप


https://marathi.abplive.com/news/ahmednagar/maratha-reservation-survey-are-doing-first-pass-employees-anger-maratha-community-video-viral-marathi-news-1250057

Manoj Jarange: सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यामधे मनोज जरांगेंच्या भेटीला

Manoj Jarange: सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्यामधे मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराव आर्दड  मनोज जरांगेंच्या भेटीला गेले आहेत. 

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात पोहचले...

Manoj Jarange In Lonavala : रात्रभर प्रवास करत मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसोबत लोणावळ्यात पोहोचले आहेत. लोणावळ्यात मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची काही वेळात सभा होणार आहे. सभेच्या ठिकाणी मराठा बांधवांसाठी खास नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. ज्यामध्ये चपाती ,भाकरी ,ठेचा, चटणी गरमागरम चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे पोहोचलेले मराठा बांधव या नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत.

Manoj Jarange: मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात, काही तासातच पोहचणार मुंबईच्या वेशीवर

Manoj Jarange: मनोज जरांगेंचं काळजात धडकी भरवणारे भगवं वादळ लोणावळ्यात, काही तासातच पोहचणार मुंबईच्या वेशीवर


https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-morcha-reaches-lonavala-towards-mumbai-maratha-reservation-maharashtra-marathi-news-1250014

पार्श्वभूमी

Manoj Jarange Mumbai March Live Update : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) नेतृत्वाखाली निघालेलं भगवे वादळ आता मुंबईच्या (Mumbai) वेशीनजीक येऊन ठेपले आहे. मराठा आरक्षण संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकारी आंदोलकांनी जालना (Jalna), बीड (Beed), अहमदनगर (Ahmednagar) आणि आता पुणे (Pune) जिल्ह्याची सीमा ओलांडून मुंबईच्या वेशीवर धडक दिली आहे. विशेष म्हणजे लाखोच्या संख्येने असलेल्या या जनसमुदायाला घेऊन मनोज जरांगे उद्या (26 जानेवारी) रोजी मुंबईत धडकणार आहे.


पिंपरी-चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली, फटाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. पहाटे साडेचार वाजता मोठ्या संख्येने मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.