पुणे :  पुण्यात मनोज जरांगेंना (Manoj Jarange)  मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर सरकारी पातळीवरून आता वेग आला  आहे.  मुंबईला भगवं वादळ धडकण्यापूर्वी सरकारकडून  जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे (chhatrapati sambhaji nagar)  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड  जरांगेची भेट घेणार असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहेत. जरांगेंनी आंदोलन स्थगित करावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता जरांगे या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आहे. 


छत्रपती संभाजीनगरचे (chhatrapati sambhaji nagar)  विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड  जरांगेची भेट घेणार असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहेत. तसेच शासनाच्या वतीने मागणीवर चर्चा होणार आहे. शासनााचे आदेश घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आजची चर्चा  सकारात्मक होईल आणि  मनोज जरांगेंचे समाधान होईल असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच मुंबईतून सुद्धा एक प्रतिनिधी लोणावळ्याकडे ( Government delegation In Lonavala)   रवाना झाले आहेत. आजच ही भेट होण्याची शक्यता आहे.


मराठा मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला


न्यायालयात जाण्याचा अधिकार आम्हालाही आहे. आमचे वकील आमची बाजू मांडतील. कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया मोर्चाविरोधातील याचिकेवर मनोज जरांगेंनी दिली आहे. मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला, जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे.सायन - पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवे मार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल , कामोठे , कंळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता  मुंबई - पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे. 


मराठा मोर्चासाठी पनवेल , रायगड जिल्हातून 10 लाख भाकरी , चपाती


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. जरांगेंचा मोर्चा आज लोणावळ्यातून पुढे सरकतोय. आज हा मोर्चा पनवेलमध्ये मुक्कामी असणार आहे. तसंच या कार्यकर्त्यांसाठी पनवेल आणि रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी आणि चपात्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 


कडाक्याच्या थंडीत हजारोंची गर्दी


मनोज जरांगेच्या मोर्चाला कडाक्याची थंडी असतानाही हजारोंच्या संख्येनं गर्दी केली होती. सकाळी मोर्चा लोणावळ्यात पोहचलाय  हातात झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, एका मराठा लाख मराठाच्या पताका, टाळ - मृदंगाचा गजर करत नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. प्रमुख रस्त्यावरून मोर्चा जात असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.



हे ही वाचा :


Gunratna Sadavarte : मनोज जरांगेंना मुंबईत येण्यास परवानगी देऊ नये; गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर आज कोर्टात काय घडलं?