मुंबई : लोकसभा जागावाटपासंदर्भात (Lok Sabha Election 2024 ) मुंबईत आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) महत्वाची बैठक होणार आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतल्यामुळे आज होणाऱ्या महाराष्ट्रातील बैठकीला (Maha Vikas Aghadi (MVA) alliance meeting in Mumbai) विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत काय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय लोकांचं लक्ष लागले आहे. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार आहे. कोणता पक्ष किती आणि कोणती जागा लढवणार? याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांना, तर राजू शेट्टी यांना शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आज याबाबत निर्णय होऊ शकतो. 


Maha Vikas Aghadi (MVA) alliance meeting in Mumbai कोणते नेते हजर राहणार  - 


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जागावाटपासंदर्भात आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  उपस्थित असतील. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहेत. मुंबईमधील  ट्रायडेंट हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. 


राजू शेट्टींना आमंत्रण नाही - 


महाविकास आघाडीच्या बैठकीचं राजू शेट्टी यांना आमंत्रण आलेलं नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली. त्याशिवाय राजू शेट्टी सध्या एकला चलो रेच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचे मला निमंत्रण आलेले नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं. 


आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडण्याची शक्यता आहे. पण राजू शेट्टी मात्र एकला चलो रे च्या भूमिकेवर अजून तरी ठाम आहेत.  


जागावाटपावरुन दुमत - 


राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झाले नाही. शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. त्याशिवाय काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत बैठकात तोडगा निघालेला नाही. त्यात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाकडून त्यांच्या कोट्यातील दोन जागा प्रकाश आंबेडकर यांना दिल्या जातील, तर शरद पवार गटाकडून एक जागा राजू शेट्टी यांना देण्याचा विचार सुरु आहे. आज यासंदर्भात चर्चा पार पडणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झालेय. 


आणखी वाचा :


तुफान आलंया! कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास, पहाटे 4 वाजता लोकांकडून सत्कार, मुंबईच्या दिशेने कूच