Manoj Jarange Maharashtra Visit : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला (Maharashtra Tour) आजपासून सुरुवात होणार आहे. दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी गावातील महिलांनी मनोज जरांगेंचं औक्षण केलं आहे. 23 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगेंच्या महाराष्ट्रभरातील (Maharashtra News) दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या दौऱ्यातली पहिली सभा आज सोलपुरातील (Solapur) वांगी येथे पार पडणार आहे. दौऱ्याला सुरुवात करताना मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ABP माझाशी संवाद साधला. लोकशाहीच्या मार्गानं शांततेत आंदोलन सुरू आहे, 24 डिसेंबरच्या आत मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळवणारच, असा निर्धार मनोज जरांगेंनी व्यक्त केला आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबपर्यंत मुदत दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झाले आहेत. धाराशिवमधील परांडा आणि वाशी तालुक्यात त्यांची सभा होणार आहे, तर भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची दुपारी 2 वाजता कॉर्नर सभा होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे. ही सभा 125 एकर शेतात होणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं या सभेची तयारी करण्यात येत आहे. 


कधी, कुठे आणि किती वाजता मनोज जरांगेंची सभा?


मनोज जरांगे हे आजपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आज धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या सभा आहेत. सकाळी 9 वाजता आंतरवाली सराटी येथून दौऱ्यासाठी निघतील. सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे पहिली सभा होईल. दोन वाजता इट, साडेचार वाजता परंडा, रात्री आठ वाजता करमाळा येथे सभा होईल.


दरम्यान, मनोज जरांगे यांची धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि परंडा तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथ आज सभा होणार आहे. या सभांना मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू करणार आहे. या सभेमध्ये मराठा आरक्षणाची भूमिका, सरकारला दिलेला वेळ, यानंतर समाज कोणती भूमिका घेणार? या विषयी जरांगे माहिती देणार आहेत. 


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, जरांगे कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष