सांगली : छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले. 

टीका करण्याचं कामच त्यांना आहे. त्यामुळे त्यांना महत्त्व द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. त्यामुळे यापुढे त्यांना महत्त्व देणार नाही. राहुल गांधींनी विजय वेडट्टीवार यांना विरोधी पक्षनेता मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं करण्यासाठी दिले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते बोलत असतील. तर, पंकजा मुंडे यांना गोरगरिबांची जाण आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी काम केलं आहे. त्यामुळे त्या या सभेला आल्या नसतील असेही जरांगे म्हणाले. 

विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर...

भुजबळांना निवडणुकीत पाडा असं मी कधीच म्हटलं नाही. आमच्या मराठ्याच्या नेत्यांना तुम्हाला पाडणे शक्यच नाही. आमचे नेते खूप नमुनेबाज असल्याचे जरांगे म्हणाले. तर, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देतांना जरांगे म्हणाले की. "तुम्ही खाता किती. आम्ही तुमच्या लेकरांबद्दल कधी वाईट बोललो नाही. बकरे वगैरे म्हणून दुसऱ्यांच्या मुलांना वाईट बोलू नका. आम्ही तुमच्या लेकरांचं बकरे म्हणून कधी उल्लेख केला नाही. पण असे बोलून तुम्ही मुलांचं अपमान करत आहात. यांचा तोल गेला असेल, असा टोला जरांगे यांनी लगावला आहे. 

भुजबळांची हकालपट्टी करा, संभाजीराजेंची मागणी 

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chagan Bhujbal : तो पाचवी तरी पास आहे का? माझ्या शेपटीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना थेट इशारा