मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं आज पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना काल रात्री हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले , परंतु पहाटे त्याचं निधन झालं. मनोहर जोशी यांच्या निधनाच्या बातमीने साऱ्यांनाच अतिशय दुख: झाले आहे. अशातच, जोशी सरांचे निकटवर्तीयांपैकी एक असलेले आणि पूर्वी भाजपमध्ये असलेला मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)  यांनी जोशी सरांच्या अनेक आठवनिनां उजाळा देत काही अपरिचित किस्से सांगितले आहे. 


हल्लीचे राजकारण बघता सरांचे संस्कार आठवतात


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जोशी सरांच्या आठवणींना उजाळा देताना ते अतिशय भावुक झाले. त्यावेळी ते म्हणाले की, जोशी सर गेल्याचे मला अत्यंत दुःख झाले आहे. जवळजवळ पंचवीस वर्षाहून अधिक काळ माला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सहवासात राजकारणाच्या व्यतिरिक्त ही अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. अतिशय प्रेमळ, मनमोकळेपणा मी त्यांच्या सहवासात अनुभवला. राजकारणा पलीकडे एक कौटुंबिक नाते आमचे त्यांच्यासोबत होते. राजकारणात आपण कसे असायला पाहिजे, राजकारण कसे केले पाहिजे, हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्या कालखंडामध्ये विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, प्रमोद नवलकर साहेब इत्यादींसह अनेक जुने नेते यांनी हसत खेळत राजकारण केले. त्या राजकारणात कुठलीही  सूडबुद्धी नव्हती. वेळप्रसंगी एकमेकांविरुद्ध टोकाची भूमिका घ्यायचो, टोकाची टीकाही करायचो, मात्र त्याच पद्धतीने ती टीका स्वीकारण्याची तयारी देखील होती. असे एकनाथ खडसे म्हणाले. 


आजच्या राजकारणात आणि त्यावेळीच्या राजकारणात फार अंतर आहे. हल्लीचे राजकारण दूषित झाले आहे. त्याला सूडबुद्धीची किनार लागली आहे. किंबहून यात तुलनाच होऊ शकत नाही.  एकमेकांबद्दलची पारिवारिक भावना नष्ट झाली आहे. त्या कालखंडामध्ये आम्ही एकत्र जेवण करत होतो. एकत्र प्रवास करत होतो. आमच्यात असं कधीही होत नव्हतं की, आम्ही एका विरोधी पक्ष नेता आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना असं कधी झालं नाही की, एका गाडीत बसताना देखील कुणी संशयाचे वातावरण निर्माण करत नव्हतं. हल्ली केवळ बोलण्याने एकमेकांबद्दल संशय निर्माण होतो. अशी सध्याची स्थिती आहे. अशावेळी  न राहून मनोहर जोशी यांनी केलेल्या संस्काराची आठवण होत असल्याचे देखील एकनाथ खडसे म्हणाले. 


क्रिकेट सामना, पहिला विदेश प्रवास, केवळ जोशी सरांमुळे 


जोशीसरांच्या जाण्याने आज एक प्रांजळ व्यक्तिमत्व आपल्यातून हरवले आहे. एक असा नेता ज्यांनी आम्हाला भरपूर काही गोष्टी शिकवल्या. कारण त्या कालखंडामध्ये युतीचे सरकार हे पहिल्यांदा महाराष्ट्रात आलं होतं. मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा आम्हाला स्थान मिळालं होतं.  त्यावेळी मंत्रिमंडळ कशा पद्धतीने चालवायचं, याचा पायंडा मनोहर जोशी यांनी घालून दिला होता. त्यावेळी आम्हाला ना कुठल्या आमदारकीचा, ना कुठल्या मंत्रिमंडळाचा, असा कुठलाही अनुभव नसतांना त्यांनी आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या. त्यांच्यासोबतच्या असंख्य आठवणी माझ्या स्मरणात आहे. त्यांच्यासोबत पहिल्यांदा मी परदेश विमान प्रवास केला. त्या कालखंडात परदेश प्रवास सहज होत नव्हता. मात्र ही संधी मला त्यांच्यामुळे मिळाली.


त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्त एक क्रिकेट सामना रंगला होता. त्यावेळी भारताचे नामांकित खेळाडू त्या क्रिकेट सामन्यात हजर होते. यामध्ये अगदी सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन इत्यादींसारखे अनेक नामवंत खेळाडू उपस्थित होते. त्यांच्यासोबत एक शो-मॅच क्रिकेट सामना रंगला होता. ज्यात मला देखील मनोहर जोशी सरांच्या नेतृत्वामुळे संधी मिळाली होती. असे अनेक किस्से त्यांचे सांगता येईल. मात्र आज एक चांगला नेता आपल्यातून हरवलेला. एक भावना स्पर्शी, भावनात्मक नाते माझं त्यांच्याशी होते. असे नेते हल्ली फार विरळ आहे. आत्ताच्या राजकारणात असा नेता होणे फार अवघड बाब आहे, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या