Devendra Fadanvis ABP Network Ideas Of India Live : माझ्यासाठी हिंदूंत्व म्हणजे टोलरन्स आहे. हिंदुत्व माझ्या नसानसात आहे. हिंदू धर्मात जन्मलेल्या अभिमान आहे, असे देवेंद्र फडमवीस म्हणाले. ते एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात बोलत होते. मी कारसेवक होतो सर्व कारसेवेत मी होतो. मी बाबरीचा ढाचा पडताना तिथे होतो मला याचा अभिमान आहे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. एबीपी नेटवर्कची वार्षिक शिखर परिषद 'आयडिया ऑफ इंडिया'ला (Ideas Of India) आजपासून सुरुवात झाली. 23 आणि 24 फेब्रुवारी अशा दोन दिवस हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात विविध वक्ते आपली मतं व्यक्त करतात. आज देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केले.
भाजपचा कार्यकर्ता हा भाजपचा असेट आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांची काम करण्याची प्रेरणा हे त्यांचे विचार आहेत. मोदींजींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपचा कार्यकर्ता काहीही करायला तयार आहे. मी 10 टक्के राजकारणावर बोलतो. ही निवडणूक मोदींनी काय केले आणि काय करणार आहेत यावर आहे? कुणावर टीका करणारे नसेल. मी मोदींनी काय केले हेच सांगणार आहे. माझ्यासाठी हिंदूंत्व म्हणजे टोलरन्स आहे. हिंदुत्व माझ्या नसानसात आहे. मी कारसेवक होतो, सर्व कारसेवेत मी होतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिल्लीत जाणार नाही -
दिल्लीच्या वातावरणाचा अनुभव घेऊन मी परत मुंबईत येतो. कारण दिलीपेक्षा मुंबईचे वातवरण चांगलं आहे. राज्यात जे वातावरण गरम वाटतंय त्याचे कारण जनेतेने दिलेले आहेत. बहुमत नाकारले गेले आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. मागच्या पेक्षा चांगली कामगिरी यावेळी आमची राहील. अजून खूप काही बाकी आहे मी आधीच बोललोय आगे आगे देखो होता है क्या? असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशात आज जी परिस्थिती काँग्रेसची आहे त्यावरून त्यांच्या नेत्यांना भविष्य दिसत नाही. आज नवीन भारताचा अनुभव लोक घेत आहेत. त्यामुळे आमच्यासोबत लोक येतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आगामी लोकसभेत महायुती किती जागा जिंकणार ?
देवेंद्र फडणवीसांना आगामी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला किती जागा मिळणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीसांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्यासमोर आव्हानं नाहीत, असे मी कधीच म्हणणार नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. आता आम्हाला त्यापेक्षा पुढे जायचं असेल तर मेहनत ही करावीच लागेल. आम्ही गेलो तर यापेक्षा पुढेच जाऊ, पण आम्ही गेल्या दोनवेळच्या जागांपेक्षा खाली येणार नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितले.
आणखी वाचा :
उद्धव ठाकरे मित्र होते, आज नाहीत का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...