बारामती : बारामती कोर्टाने आज मनोहर भोसलेला (Manohar Bhosale) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बारामतीतील रहिवासी शशिकांत खरात यांच्या वडिलांना अघोरी उपचार केल्याप्रकरणी आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 8 तारखेला मनोहर भोसले आणि त्याच्या अन्य 2 साथीदारांवर बारामती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. 10 तारखेला मनोहर भोसलेला बारामती पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला सुरवातीला 5 दिवस आणि नंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.


फसवणूक आणि बलात्कारासारखे गुन्हे दाखल झालेल्या मनोहरमामाची राजकारणी आणि बड्या मंडळींना भुरळ


आज मनोहर भोसलेला एन व्ही रणवीर यांच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसलेचा एक साथीदार ओंकार शिंदे हा बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाला.. त्याला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप त्यांचा एक साथीदार फरार आहे. दरम्यान आज पोलिसांनी स्वतःहून मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी मागितली होती. पण मनोहर भोसलेच्या वकिलांनी पोलीस कोठडी मागितली होती.


Balu Mama : लोकसंत बाळूमामांच्या भक्तांमध्ये बेबनाव, अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, प्रकरण नेमकं काय?


परंतु पोलिसांनी न्यायालयीन कोठडी का मागितली असा सवाल आरोपीच्या वकिलांनी केला. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पोलीस संशयास्पद वागत आहेत म्हणून  पोलिसांविरोधात मनोहर भोसले यांचे वकील उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती अॅड. रुपाली ठोंबरे यांनी सांगितले. सध्या बारामतीत सध्या करमाळा पोलिसांचे पथक दाखल झाला आहे. सध्या मनोहर भोसलेच्या जामिनाची प्रक्रिया केली गेली. मनोहर भोसलेला जामीन मिळताच करमाळा पोलीस मनोहर भोसलेला ताब्यात घेतलं.


Manohar Bhosale | भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना बारामती पोलिसांकडून अटक


मनोहर भोसलेला आता करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले विरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.


पाहा व्हिडीओ : Balu Mama : अखेर मनोहर मामा भोसलेंविरोधात तक्रार दाखल, काय आहे मामांची मनोहर 'कहाणी'?