Armed robbery at State Bank: कर्नाटकातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर 15 सप्टेंबर रोजी पडलेल्या तब्बल 21 कोटींच्या धाडसी दरोड्याला आता मंगळवेढ्याचे नवे कनेक्शन मिळाले आहे. दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार ही मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून 8 सप्टेंबर रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. हीच कार दरोडा घालून पळताना हुलजंती येथे अपघातग्रस्त अवस्थेत पोलिसांच्या हाती लागली. त्यातून रोकड व सोन्याचे काही दागिने मिळाले. यानंतर केवळ दोन दिवसांत हुलजंती येथील जुन्या घराच्या पत्र्यावर ठेवलेली बॅग पोलिसांना सापडली. त्यामध्ये साडेसहा किलो सोने आणि तब्बल 41 लाख 4 हजार रुपये रोख रक्कम मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. या सोन्याच्या 136 पाकिटांसह हेल्मेट, मास्क असे साहित्यही कारमध्ये सापडले.
राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा रंगली
कर्नाटक पोलिसांनी हा मुद्देमाल ताब्यात घेऊन तपास अधिक गतीमान केला आहे. या संपूर्ण घटनेतून मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव आणि हुलजंती या दोन गावांचा दरोड्याशी थेट संबंध जोडला जात असून आता या प्रकरणामागे राजकीय सूत्रधार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या कर्नाटक, मंगळवेढा, सोलापूर आणि उमदी येथे पोलिसांच्या पथकांकडून नऊ संशयितांची चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे या दरोड्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी कार चोरीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या धाडसी दरोड्यातील मंगळवेढा नवे कनेक्शन समोर आले आहे. या दरोड्यात वापरण्यात आलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला गेल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता या दरोड्यात असणाऱ्या मध्ये मंगळवेढा तालुक्यातील कोणी आहे का? हा नवीन अँगल पोलिसांना मिळाला आहे. आता पोलिसांनी कार चोरीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून यामुळे या दरोडा प्रकरणातील मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. आता पोलीस कायद्यानुसार ही गाडी चडचण पोलिसांकडून तपासासाठी लवकरच ताब्यात घेणार आहेत.
चोरीतील कारची माहिती समोर आली
चडचणमध्ये 15 सप्टेंबर रोजी टाकण्यात आलेल्या धाडसी दरोड्यात जवळपास 21 कोटी रुपयाचा ऐवज लंपास केला होता. या गुन्ह्यात वापरलेली मारुती कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावातून चोरण्यात आल्याचे आता समोर आले आहे. ही कार मंगळवेढ्यातून आठ सप्टेंबर रोजी चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरोड्यात ही कार वापरण्यापूर्वी चोरट्यांनी या कारची नंबर प्लेट बदलली होती. ही कार मूळ साताऱ्याच्या मालकाची असून त्याने कोल्हापूरच्या एजंटमार्फत मंगळवेढ्यातील आंधळगाव येथे त्याची विक्री केली होती. मात्र, ही विक्री केवळ करार करून केल्याने अजून कागदपत्रे आंधळगावच्या मालकाच्या नावावर झाली नव्हती. दरम्यान आठ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेला आंधळगाव येथून या मालकाच्या घरासमोरून ही गाडी चोरीला गेली होती. पोलीस आता या कार चोरांची सीसीटीव्ही फुटेज शोधू लागले असून ते मिळाल्यास चडचण दरोडा प्रकरणात मोठा खुलासा होऊ शकेल.
मुद्देमाल असलेली बॅग पोलिसांना सापडली
मंगळवेढ्यातील आंधळगाव येथून 8 सप्टेंबर रोजी चोरलेल्या कारचा वापर 16 सप्टेंबर रोजी झालेल्या चडचण येथील बँक दरोड्यात करण्यात आला होता. त्यानंतर दरोडा टाकून पळून जाताना दरोडेखोरांची गाडीही मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे एका दुचाकीला धडकल्याने पोलिसांना मिळाली होती. या गाडीतही काही रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून आले आहेत. मात्र याचा नेमका आकडा कर्नाटक पोलिसांकडे आहे. यानंतर केवळ दोनच दिवसात हुलजंती येथील एका जुन्या घराच्या पत्र्यावर दरोड्यातील लुटलेल्या ऐवजाचा काही मुद्देमाल असलेली बॅग पोलिसांना सापडली आहे. यामध्ये सहा किलो सोने आणि जवळपास 40 लाख रुपयाची रोकड मिळाल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. मात्र ही बॅग कर्नाटक पोलिसांनी सील करून घेऊन गेल्याने याचाही नेमका आकडा अजून समोर आलेला नाही.
चडचण येथे दरोड्यात वापरण्यात आलेली कार मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथून चोरीला जाणे यानंतर दरोडा टाकून पळून जाताना ही कार मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे सापडणे आणि दरोड्यातील काही किमती मुद्देमाल असणारी बॅग देखील हुलजंती येथे सापडणे यावरून आता चढचण दरोड्यात मंगळवेढाचे नवीन कनेक्शन समोर आल आहे हे मात्र नक्की. चडचण पोलिसांना मिळालेल्या बॅगेत आणि कारमध्ये एकूण सात किलो सोने आणि 44 लाख रुपये असल्याची माहिती आहे. या तपासासाठी मंगळवेढा सोलापूर आणि उमदी या तीन ठिकाणी पोलिसांच्या टीम काम करीत असून सध्या जवळपास नऊ संशयतांची चौकशी केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दरोड्यामागे सूत्रधार राजकीय असल्याची ही नवीन चर्चा सुरू झाली आहे. बॅगमध्ये साडेसहा किलो सोने आणि 41 लाख 4 हजार रुपये रोकड चढचण पोलिसांना मिळाली. म्हणजेच जवळपास 136 सोन्याची पाकीट यामध्ये होती. याशिवाय मंगळवेढ्यातून चोरीला गेलेल्या कारमध्ये त्यांना एक सोन्याचे पाकीट हेल्मेट मास्क असे साहित्य मिळाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या