Nagpur News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी (Zilla Parishad Election 2025) जिल्हा परिषदांचे सर्कल नवीन रोटेशननुसार आखण्यास आव्हान देणाऱ्या चार याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) फेटाळल्या आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणूक होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. यात नागपूर अमरावती आणि बुलढाणा मधील राजकीय कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात (Zilla Parishad Election 2025) या याचिका दाखल केल्या होत्या, ज्यामध्ये नवीन रोटेशन लागू करण्यास आव्हान दिले होते. मात्र नागपूर खंडपीठाने काल (19 सप्टेंबर) या याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. तसेच नवीन रोटेशनबद्दल राज्य सरकारचा निर्णय अवैध नसल्याचे जाहीर केलंय.

Continues below advertisement

नवीन रोटेशनसाठी ही पहिली निवडणूक ग्राह्य धरली जाणार

मिळालेल्या माहितीनुसार, याचिकेत मांडलेले मुद्दे केवळ काल्पनिक असून जागेच्या आरक्षणाबाबत कोणीही कोणताही हक्क सांगू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने चार ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे नवीन रोटेशनसाठी ही पहिली निवडणूक ग्राह्य धरली जाणार आहे. तर राज्यघटनेतील आर्टिकल 243-ओ अनुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही, असे युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले होते.

महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांच आरक्षण जाहीर, संपूर्ण यादी- (Reservation for 34 Zilla Parishad president)

  1. ठाणे -सर्वसाधारण (महिला)
  2. पालघर - अनुसुसूचित जमाती
  3. रायगड- सर्वसाधारण
  4. रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  5. सिंधुदुर्ग - सर्वसाधारण
  6. नाशिक -सर्वसाधारण
  7. धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  8. नंदूरबार-अनुसूचित जमाती
  9. जळगांव - सर्वसाधारण
  10. अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
  11. पुणे -सर्वसाधारण
  12. सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  13. सांगली - सर्वसाधारण (महिला)
  14. सोलापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
  15. कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
  16. छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
  17. जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  18. बीड -  अनुसूचित जाती (महिला)
  19. हिंगोली -अनुसूचित जाती
  20. नांदेड - नागरिकांचा मागास प्रवर्ग
  21. धाराशिव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
  22. लातूर - सर्वसाधारण (महिला)
  23. अमरावती - सर्वसाधारण (महिला)
  24. अकोला - अनुसूचित जमाती (महिला)
  25. परभणी - अनुसूचित जाती 
  26. वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
  27. बुलढाणा -सर्वसाधारण
  28. यवतमाळ सर्वसाधारण
  29. नागपूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
  30. वर्धा- अनुसूचित जाती
  31. भंडारा - नागरिकांचा मागास प्रवर्ग
  32. गोंदिया - सर्वसाधारण (महिला)
  33. चंद्रपूर - अनुसूचित जाती (महिला)
  34. गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)

आणखी वाचा

Continues below advertisement

Nagpur Ward Delimitation: एका विशिष्ट राजकीय पक्षाला फायदा पोहोचवण्यासाठी प्रभाग रचना केली का? नागपूर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीवेळी सवाल