नाशिक: अहमदनगर, नाशिकला फिरायला किंवा माळशेज घाटमार्गे गावी जायचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण माळशेज घाट शनिवार-रविवार दोन दिवस वाहतुकीसाठी बंद असेल, अशी माहिती टोकावडे पोलिस निरीक्षक धनंजय मोरे यांनी दिली.
कल्याण आणि त्यापुढील भागात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे कोणत्याही क्षणी दरड पडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
खबरदारी म्हणून पर्यटकांनी माळशेज घाटात जाणं टाळावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
शनिवारी आणि रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे.