Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपुरातून (Nagpur New) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणं तरुणाला चांगलंच भोवलंय. यात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तलावात कोसळलाय. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजबळील मकरधोकडा तलावात काल संध्याकाळी ही घटना घडली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मकरधोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. त्याचं वेळी या गर्दीतील एकने नसतं धाडस केलं आणि यात ही अपघाताची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक घटनास्थळी उपस्थीत असताना देखील या तरुणाच्या बचाव कार्यात यश आले नाही. मात्र या घटणेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
क्षणात झालं होत्याचं नव्हतं
देशाचा स्वातंत्र्य दिन काल देशभरात अतिशय उत्साह आणि आनंदाने साजरा करण्यात आला. हा स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी अनेकांनी पर्यटन स्थळी गर्दी केली होती. अशीच काहीशी गर्दी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड शहराजवळील मकरधोकडा तलावाजवळ देखील बघायला मिळाली. मात्र याच गर्दीचा भाग असलेल्या काही तरूणांचे नसतं साहस त्यांच्या अंगलट आले आहे. यातील तीन तरुण अचानकच ज्या सांडव्यावरून तलावाचा पाणी समोरच्या दिशेने वाहतं, त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. एक तरुण त्यात यशस्वी झाला. मात्र दोघे खाली घसरले. त्यातील जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता, तो नंतर विपरीत दिशेने तलावात कोसळला.
परिणामी, त्याला पोहोता येत नसल्यामुळे त्याचा काही सेंकदात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आकाश घनश्याम चकोले (वय 23 वर्ष रा. गोपाल नगर कळमना जिल्हा नागपूर) असं या मृतक तरुणाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक ही घटना बघत होते, तर काहीनी हे दृश्य मोबाइल मध्ये कैद केलं. मात्र त्यातील मोजकेच लोक प्रयत्न करत असताना त्यांना देखील यश आले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ समाज मध्यमांवर प्रचंड वायरल होत आहे.
पवनार इथल्या धाम नदीपात्रात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
अशीच एक घटना काल वर्ध्याच्या पवनार इथल्या धाम नदीपात्रात घडली आहे. यात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार यात पाच ते सहा जणांनी धाम नदीच्या पात्रात पोहाण्यासाठी पाण्यात उडी टाकली होती. दरम्यान, दोघांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झालाय. तर त्यातील एकाला ग्रामस्थांकडून वाचविण्यात यश आले आहे. सोबतच्या इतरांनी कसंबसं मार्ग काढत नदी पात्राचा काठ गाठलाय. शुभाई खान आणि नसिम खान असे या दोघेही मृतकांचे नाव असून ते दोघे उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. तर एकाचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले असून इतर एकाच शोध सुरू आहे.
हे ही वाचा