हणमंत गायकवाड यांचा थोडक्यात परिचय
रहिमतपूर या साताऱ्यातल्या दुर्गंभागात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून हणमंतरावांची परिस्थिती अत्यंत खडतर होती. इतकी की त्यांच्या खिशात एक बसच तिकिट काढायला ही पैसे नसत. त्याकाळापासून सुरू झालेला प्रवास अडचणींचा पालापाचोळा दूर सारत त्यांनी सुरू केला आणि स्वच्छाता अभियानाचा वसा हाती घेतला.
तसं बघितलं तरसाफसफाईचं काम हे हलक्या दर्जाचं काम म्हणून हिणवलं जातं. पण याच कामाचा वापर करून पुण्यातल्या हणमंत गायकवाड या उद्योजकाने बीव्हीजी या कंपनीची स्थापना केली. १९९७ साली फक्त आठ सहकाऱ्यांच्या साथीने सुरू केलेल्या या कंपनीत आज एकूण 65 हजारापेक्षाही अधिक कर्मचारी काम करतात. आज ही कंपनी राष्ट्रपती भवन, संसद भवन,दिल्ली हायकोर्ट अशा महत्त्वाच्या ठिकाणांची (क्लिनिंगग)स्वच्छता, साफसफाई आणि मेंटनन्सची कामं करते. सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत कंपनीने झेप घेतली आहे.
कंपनीचा हा प्रवास सहजसोपा नव्हता, मात्र तो अशक्यलही नव्हता. "पेशन्स' ॲण्ड "क्रेडिबिलिटी' हेच दोन परवलीचे शब्द मानले, सहकाऱ्यांतही तेच बीज पेरले आणि यशाची नवीन शिखरे आपोआप सर होत गेली असं हणमंत गायकवाड सांगतात. बीव्हीजी कंपनीचे नाव सध्या विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे. या कंपनीनं सिव्हील इंजिनीअरींग, लँडस्केप डिझायनींग ॲण्ड गार्डनिंग अशा क्षेत्रातदेखील क्लिनींग आणि मेंटनन्सची कामे करण्यास सुरवात केली आहे.
आज या कंपनीची कारर्कीद संपुर्ण जगभरात पसरलीय. भारतात एकवीस तर लंडन आणि सिंगापूरमध्ये कंपनीच्या दोन शाखा उघडण्यात आल्या आहेत. येत्या दहा वर्षांत दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट हणमंत गायकवाड आणि बीव्हीजी कंपनी ठेवते. उद्योजक हणमंत गायकवाड यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझाच्या शुभेच्छा.
संबंधित बातम्या