डॉ. सुधीर गाडगीळ यांचा थोडक्यात परिचय
पेशाने डॉक्टर, पण तरीही रेषेच्या विविधतेत सतत रमणारी अशी ही व्यक्ती. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन. चित्रांची वेगळी आणि सोपी, पण काहीतरी सांगणारी अशी शैली. जी आज ही समीक्षकांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना भावणारी आहे. चित्रकार सुधीर पटवर्धन लोकांच्या खासगी आणि सामाजिक जीवनाचा चित्रातून एकाच वेळी वेध घेतात. त्यांच्या चित्रांत मानव कधी संघटित तर कधी विघटित स्थितींमध्ये आढळतो. पटवर्धनांच्या कॅनव्हासवर औद्योगिकीकरणाच्या रेट्यात मागे हटत गेलेला निसर्ग दिसतो. चित्रांतील व्यक्ति या कष्टकरी, कारखान्यांतले कामगार, बांधकामावरचे मजूर, साधे प्रवासी अशा प्रकारची असतात.
अभिजात ग्रंथ वाचणारे, चर्चा करणारे, काही चित्रकार असतात. त्याच गटातले चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन. वाचनाची आवड असल्याने तरूणपणी कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर झाला. त्याचप्रमाणे कामू, सार्त्र आणि सिमॉन द बोवा हे लेखक मी वाचले असे ते सांगतात. त्या वाचनाचा, त्या विचारांचा माझ्या कलेवर परिणाम झाला असे ही ते म्हणतात.
प्रख्यात चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्राला दाद देणारे दर्दी हे केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. अनेक जाणकारांच्या संग्रही पटवर्धवन यांच्या चित्रांचं संग्रह असणं हे कलेच्या वर्तुळात अत्यंत मानाचं समजलं जातं. अनेकांना चित्रशिल्प बघायला आवडते पण त्यासाठी चांगल्या संधी मिळत नाही. ही उणीव लक्षात घेऊन त्यांनी एक उपक्रम राबवला. ‘विस्तारणारी क्षितिजे या आधुनिक आणि समकालीन भारतीय केलेचे फिरते प्रदर्शनाचं आयोजन आठ वेगवेगळ्या शहरात त्यांनी केल होतं. अशा या जगविख्यात प्रतिभावंत चित्रकाराला एबीपी माझाचा मानाचा मुजरा.
संबंधित बातम्या
संबंधित बातम्या