Majha Maharashtra Majha Vision : स्टार्टअप ही देशाच्या भविष्याची गुरुकिल्ली असून ज्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी आहे त्या ठिकाणी स्टार्टअपला वाव देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे असं उद्योगपती आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. 


अरुण फिरोदिया म्हणाले की, "जगातल्या अनेक देशांमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येत असून राज्यात सुरुवातीला मुंबई आणि पुण्यामध्ये स्टार्टअपसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करुन द्याव्यात. पुण्यात जवळापास दोन लाख प्रशिक्षित युवक असून त्यांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. सरकारने स्टार्टअपला स्वस्तात जागा उपलब्ध करुन दिल्या तर त्यामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येऊ शकेल."


खासगी उद्योगांना सर्वच क्षेत्रात मूभा द्या
उद्योजक अरुण फिरोदिया म्हणाले की, "आपल्या देशात 1991 साली जागतिकीकरण करण्यात आले. चीनमध्ये तीच गोष्ट 1975 साली झाली. त्यामुळे चीनची प्रगती भारतापेक्षा जास्त आहे. सर्वच क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वाव मिळाला पाहिजे. पाठबंधारे, वीज निर्मिती, रस्ते बांधकाम तसेच अनेक क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला वाव दिला पाहिजे."


उद्योजक अरुण फिरोदिया म्हणाले की, "देशात जागतिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची गरज असून यासाठी सरकारी धोरण हे खाजगी उद्योजकांना मुभा देणारं हवं. सर्वच क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांना वाव मिळाला पाहिजे. पाठबंधारे, वीज निर्मिती, रस्ते बांधकाम तसेच अनेक क्षेत्रामध्ये खासगी क्षेत्राला वाव दिला पाहिजे. त्यामुळे देशातील खासगी उद्योगांची भरभराट होईल आणि त्यांच्याशी स्पर्धा करुन सरकारी उद्योगही अधिक कार्यक्षम होतील."


उद्योग क्षेत्राला सगळ्या क्षेत्रामध्ये मुभा देण्याची गरज असून आयटी क्षेत्राचा बदललेला चेहरामोहरा हे त्याचं उदाहरण आहे. या क्षेत्रात अधिक संशोधनाची गरज असून त्यामध्ये खासगी क्षेत्राला मोठा वाव आहे असंही अरुण फिरोदिया म्हणाले. 


स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात काहीच उत्पादन नव्हते. अगदी टाचण्या, काडेपेटीही आयात कराव्या लागायच्या. आता बहुतांश सर्व वस्तुंची निर्मिती आपल्या देशात होते. देशाने शुन्यापासून ही सर्व प्रगती केली असून यामध्ये सरकार आणि लोकांचं योगदान आहे असं उद्योगपती आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन अरुण फिरोदिया म्हणाले. जगाचं नेतृत्व करायचं असेल तर इज ऑफ डुईंग बिजनेस, कम्पिटेशन रॅन्क आणि उद्योगासंबंधी इतर अनेक गोष्टींमध्ये प्रगती केली पाहिजे. भारतासोबत कोरिया, चीन हे देश स्वातंत्र्य झाले. जपानने औद्योगिक क्षेत्रात मोठी भरारी घेतली. भारतानेही तशी प्रगती करणे आवश्यक आहे असंही ते म्हणाले. 
 
कामगार कायद्यात सुधारणा
केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा केली आहे. त्याचा फायदा आता राज्यांनी घेतला पाहीजे.  राज्यांनी आता एमएसएमईसाठीची मर्यादा 20 वरुन किमान 100 लोकांपर्यंत करणे आवश्यक असल्याचं उद्योजक अरुण फिरोदिया म्हणाले. 


उद्योजक हे  'इकॉनॉमिक वॉरियर्स' 
आपल्या देशामध्ये उद्योजकांना 'इकॉनॉमिक वॉरियर्स' म्हटलं पाहिजे आणि त्यांना महत्व दिलं पाहिजे. कारण त्यांच्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतोय. कोरियासारख्या देशांमध्ये सरकार उद्योजकांच्या मागे ठामपणे राहिलं. आपल्याही देशात हे शक्य आहे. रिलायन्स, टाटा, बिर्ला यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.  


सरकारने पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे रस्ते निर्मिती, सर्व गावांना वीज आणि सर्वांना शिक्षण. या गोष्टी देशाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. दिल्ली मुंबई-फ्रेट कॉरिडॉर हा भारताच्या विकासामधील महत्वाचा टप्पा ठरेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


हाफकिन इन्स्टिट्यूट, हिंदूस्थान अॅन्टिबायोटिक यासारख्या संस्था बंद पडल्या आहेत. यांना परत सुरु करायला हवं, लस निर्मितीचे अधिकार द्यायला हवं. लस निर्मितीसोबतच व्हायरसचे उच्चाटन महत्वाचं आहे असंही अरुण फिरोदिया म्हणाले. 


ई-व्हेईकलमध्ये क्रांती 
अरुण फिरोदिया म्हणाले की, "ई-व्हेईकलचं भविष्य फार उज्ज्वल आहे. सर्व प्रथम कमर्शियल व्हेईकलमध्ये ई-व्हेईकलचा फायदा होईल. त्यानंतर टू व्हीलरमध्ये ई-व्हेईकल वाढतील. येत्या चार पाच वर्षात कमर्शियल व्हेईकलमध्ये आणि टू व्हीलरमध्ये ई-व्हेईकलमध्ये क्रांती होईल. कायनेटिक लवकरच ई-लूना बाजारात आणणार आहे."


दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर
राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


एबीपी माझा युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M 
फेसबुक पेज : https://www.facebook.com/abpmajha 
ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv 


संबंधित बातम्या :