मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद असलेली मुंबईची लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'मुंबईची लोकल आजही सुरू आहे. लोकल सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मुंबईतील लोकल वाहतूक सुरु करायची की नाही हे राज्य सरकारच्या हातात नाही, याबाबतचा अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी लोकल सुरू करा यासाठी आम्हाला चार-पाच वेळा केंद्र सरकारला विनंती करावी लागली.
कोरोनावर उपाय योजना करण्यात सरकारला अपयश आलंय याविषयी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. त्यांना जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) मार्गदर्शनासाठी बोलावतील.
भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात...
लॉकडाऊन वाढविण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, लॉकडाऊन प्रशासन ठरवत नाही. लॉकडाऊन कोरोना ठरवत आहे. कोरोना विरुद्धची लढाई शस्त्राविना लढाई लढत आहे. कोरोनाविरुद्धची लढाई सुरू आहे. आपण गाफील राहता कामा नये.
आपण निर्णय घ्यायचा असतो आणि प्रशासनाकडून काम करुन घ्यायचं असतं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण करोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
इतर बातम्या