Majha Katta With Bachchu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी  गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप आणदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालं आहेत. रवी राणांनी आरोप करायचे आणि मी गप्प बसायचं हे माझ्याकडून शक्य होणार नाही. कारण ही अस्तित्वाची लढाई असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मला गप्प बसवलं जात असेल आणि त्यांना आवर घातला जात नसले तर मी ऐकणार नसल्याचा इशारा देखील कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर (Majha Katta) हजेरी लावली. यावेळी त्यांनी संवाद साधला. रवी राणांना पुढे करुन कोणी गेम करत असेल तर मी सहन करु शकणार नाही असेही कडू म्हणाले.

  


मग मी राजकारणही सोडून देईन...


आमदार रवी राणा यांनी टीका केली त्याचं वाईट वाटत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते योग्य नाही असं बच्चू कडू म्हणाले. राणांनी आरोप करणं आणि गप्प बसणं हे शक्य नसल्याचे ते म्हणाले. रवी राणांना कोणी पुढे करत आहे का? असा सवाल यावेळी कडूंना विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले की, जर असे कोणी राणांना पुढे करुन गेम करत असेल तर मी सहन करणार नाही.  मग मी राजकारणही सोडून देईन, मग फक्त बच्चू कडू म्हणून लढेन. माझा एक स्वभाव आहे आमने सामने लढलं पाहिजे, मागून वार केला तर मी सहन करु शकणार नाही. त्यामुळं मी कोणत्याही स्तरावर जायला तयार असल्याचा थेट इशारा बच्चू कडू यांनी रवी राणांना दिला. रवी राणा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आमदार झाले. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. मग त्यांनी खोके घेतले असं आम्ही म्हणायचं का? असे बच्चू कडू यावेळी म्हणाले. राजकारणात तडजोडी असतात. पूर्वीच्या काळी देखील या तडजोडी झाल्याचे कडू यावेळी म्हणाले. 


सत्ता पैसे देऊन स्थापन करतात का?  बच्चू कडूंचा रवी राणांना सवाल 


मी पैसे घेतले असे रवी राणा म्हणत आहेत. मग ते पैसे कोणी दिलं असं म्हणलं तर. पैसे एकानाथ शिंदेंनी दिले की देवेंद्र फडणवीसांनी दिले. मग कोण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिल असे कडू म्हणाले. सत्ता पैसे देऊन स्थापन करतात का? असा सवालही कडू यांनी यावेळी उपस्थित केला. 


याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा फोन 


बच्चू कडूंनी रवी राणांनी केलेल्या आरोपानंतर पुरावे देण्याचे आव्हान केलं आहे. यासाठी त्यांनी 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटमही राणांना दिला आहे. तसेच खुलासा केला नाही तर आम्ही धमाका करु, असाही इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. वेळ येताच पुढे काय करायचा याचा निर्णय घेऊ असेही कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजान, प्रविण दरेकर यांचा फोन आला होता अशी माहितीही बच्चू कडू यांनी माझा कट्ट्यावर दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Ravi Rana vs bacchu kadu : आमदार रवी राणा म्हणाले, त्यातला 'हा' फुसका फटाका!