Mahila Samman Savings Certificate : देशातील महिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. अशीच एक योजना गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली होती. महिला बचत सन्मान योजना असं या योजनेचं नाव असून ती पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme For Women) माध्यमातून राबवण्यात येते. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये मोठा परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक बँकांच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक करता येऊ शकते.
काय आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना? (Mahila Samman Savings Certificate)
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. त्यामध्ये महिला 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर 7.50 टक्के व्याजदर चक्रवाढ आधारावर उपलब्ध आहे.
मुदतपूर्व पैसे काढू शकता
या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षांचा आहे. तुम्ही मार्च 2024 मध्ये पैसे गुंतवल्यास, खात्याची मॅच्युरिटी मार्च 2026 मध्ये होईल. परंतु अनेक वेळा पैसे गुंतवल्यानंतर, गरज पडल्याने लोकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी खाते बंद करावे लागते. अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळते. एका वर्षानंतरही तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता.
MSSC खात्याचे मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम काय आहेत?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, खाते उघडल्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला जमा केलेल्या रकमेच्या 40 टक्के रक्कम काढण्याची सुविधा मिळते. याशिवाय जर कोणत्याही खातेदाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत नॉमिनी पैसे क्लेम करून जमा केलेली रक्कम काढू शकतो. तसेच खातेदार कोणत्याही मोठ्या आजाराच्या वेळी खात्यातून मुदतपूर्व पैसे काढू शकतो. तुम्ही कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला 7.50 टक्क्यांऐवजी 5.50 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
या योजनेसाठी खाते कसे उघडायचे?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील महिला हे खाते उघडू शकतात. सरकारने यासाठी कोणतेही वय निश्चित केलेले नाही. अल्पवयीन मुलीचे खाते पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाते. पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हे खाते कोणत्याही बँकेत उघडू शकता. खाते उघडताना तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर तुम्ही या खात्यात दोन लाख रुपये जमा करू शकता.
ही बातमी वाचा: