Mahesh Manjrekar on Majha Katta: मराठीतील प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावर बायोपिक करणार असल्याचे म्हटलं आहे. या बायोपिकची स्टोरी सुद्धा लिहिली असल्याचे महेश मांजरेकर यांनी माझा कट्टावर बोलताना सांगितलं. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक स्फोटक महेश मांजरेकर यांचा माझा कट्टा (Mahesh Manjrekar on Majha Katta) उद्या (25 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजता होईल.
मला राज यांच्यावर बायोपिक करायची आहे (Mahesh Manjrekar on Raj Thackeray)
माझा कट्टामध्ये बोलताना महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या विषयी भाष्य केले. राज ठाकरे यांच्याबाबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की मला राज यांच्यावर बायोपिक करायची आहे आणि त्या बायोपिकची मी स्टोरी सुद्धा लिहिली आहे. बुद्धिबळ असं त्या बायोपिकचे नाव असेल. ते म्हणाले की मला एका सीनमध्ये असं दिसतं की राज बाळासाहेबांना विचारत आहेत का? तेव्हा बाळासाहेब म्हणतात की एक वडील काकांसमोर जिंकले. ते पुढे म्हणाले की, ही संकल्पना इतकी जबरदस्त वाटली की वडील आणि काकांच्या लढाईमध्ये नेहमीच वडील जिंकतात.
महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना युतीवरुन बोलतं केलं (Mahesh Manjrekar on Raj and Uddhav)
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय विस्तव सुद्धा जात नसताना दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलला घेतलेल्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्धव यांच्याशी युतीवरून बोलत केलं होतं. तेव्हा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचं म्हटलं होतं आणि त्यानंतर मराठीच्या मुद्यावरून राज आणि उद्धव पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल आठ वेळा राज आणि उद्धव यांची भेट झाली आहे. कौटुंबिक संबंध पूर्ववत होत असतानाच ते मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील सर्व महानगरपालिका एकत्र लढतील असं बोललं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या