Nashik Crime: नाशिकच्या (Nashik) वणी (Vani) परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या वादाची कुरापत काढत धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात 18 वर्षीय राहुल किशोर काळे (रा. एकलहरे) याचा मृत्यू झाला तर 17 वर्षीय विजय पवार गंभीर जखमी झाला आहे.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री चौसाळे गावात तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. गर्दीच्या पार्श्वभूमीवर काही युवकांनी जुन्या वादाची कुरापत काढली आणि भांडण सुरू केले. या भांडणात विजय पवार पुढे आला व “मला का मारले?” असा सवाल केला. त्यानंतर दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. राहुल काळे याला छाती व पाठीवर वार केले गेले, ज्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाला आणि तो जागीच ठार झाला. विजय पवार गंभीर जखमी झाला असून त्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nashik Crime: सहा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये मोहन लहु पवार (रा. एकलहरे, ता. दिंडोरी), दीपक धनराज गायकवाड (रा. करंजखेड, ता. दिंडोरी), गणेश बाळू गायकवाड (रा. एकलहरे, ता. दिंडोरी), निवृत्ती पोपट चौधरी (रा. करंजखेड, ता. दिंडोरी) तसेच दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Continues below advertisement

Nashik Crime: खुनाचा गुन्हा दाखल

या प्रकरणी विष्णु पागे (वय २९, रा. एकलहरे, ता. दिंडोरी) या फिर्यादीवरून वणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे करत असून, पोलीस उपायुक्त गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र घटनेने वणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.  

Nashik Crime: नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडणाऱ्यांना अटक

दरम्यान, दिवाळी सणानिमित्ताने नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडून त्यांना त्रास दिल्याप्रकरणी नाशिक पोलोसांनी दोघा संशयितांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखविला आहे. संशयित आरोपी वैभव चोथे आणि सुमित डोकफोडे यांनी एका नागरिकांच्या घरासमोर फटाके फोडत असताना त्यांना दुसरीकडे जाऊन फटाके फोडा असे सांगितले असता राग येऊन त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी फटाके फोडले. यानंतर दगड फेकून नागरिकाच्या घराचे वाहनांचे नुकसान केल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. दारूच्या नशेत गुन्हा केला आहे, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. यापुढे अशी चूक करणार नाही असेही आरोपीने कबूल केले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

आणखी वाचा 

Satara Crime: फोन करणारे फलटण भागातील खासदार; मृत महिला डॉक्टरच्या आतेभावाचा खळबळजनक आरोप