Mahendra Dalvi on Sunil Tatkare : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्यात कलगीतुरा सुरु आहे. सातत्यानं दोन्ही नेते ऐकमेकांवर टीका करताा दिसत आहे. आज महेंद्र दळवी यांनी पुन्हा सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली. सुनील तटकरे हे ब्लॅकमेलर आहेत. ते नेहमीच ब्लॅकमेलिंग करतात. त्यांनी रायगड मधील अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेतं असा घणाघात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा सुनिल तटकरे यांच्यावर केला.

Continues below advertisement


अलिबाग मधील हेमनगर येथे आमदार महेंद्र दळवी यांचा आमदारकीच्या दुसऱ्यांदा विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांकडून तुला करण्यात आली. यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा पुन्हा खरपसून समाचार घेतला. शिवसेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेले राजीव साबळे यांनी माणगावमधील त्यांच्या शिक्षण संस्थेतील एका शाळेला मंत्री भरत गोगावले यांच्या आईचे नाव द्यायचे ठरविले होते. मात्र ऐन वेळेला नाराज झालेले साबळे यांनी ते नाव काढून सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिल्याने हा वाद सुरू आहे. शिवाय साबळे यांनी त्यांच्या एका शाळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचे दिलेले नाव सुद्धा काढून घेण्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिल्याचं दळवी म्हणाले. सुनील तटकरे यांचे हे सगळे कटकारस्थान असल्याचे ते यावेळी ते म्हणाले.


सुनील तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते


दरम्यान, कालच महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा टीका केली आहे. तटकरे यांच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्या काढत त्यांनी टीका केली. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून, त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप दळवींनी तटकरेंवर केला होता. सुनील तटकरे सारख्या नालायकांबरोबर असा उल्लेख करत त्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ या भूमिकेत आहोत, असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. तसेच मंत्री भरत गोगावले यांच्या आईच्या नावावर राजकारण करून अवमान करणं हे तटकरेंना शोभत नाही. रायगडकर हे कधीही सहन करणार नाहीत, असा इशाराही महेंद्र दळवींनी खासदार सुनील तटकरे यांना दिला. संपूर्ण भाषणातून दळवींनी तटकरेंवर आगपाखड केली आहे.


महत्वाच्या बातम्या:


राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही, आम्ही एकला चलो च्या भूमिकेत, रायगडमध्ये महायुतीत ठिणगी