Jalna News : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरताना दिसत आहे. या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने होताना दिसत आहेत. तसेच धनगर समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. अशातच धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही म्हणूनएका सरपंचाने स्वतःची गाडी पेटवली आहे. ही घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. 

Continues below advertisement

सरकार विरोधात घोषणाबाजी 

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लोणार भायगाव येथील सरपंच आंदोलक गोविंद जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी भऱ रस्त्यात स्वतःची गाडी पेटवून दिली आहे. रस्त्यात गाडी लावून सरकार विरोधात घोषणाबाजी देखील त्यांनी केली आहे. .

धनगर समाजाच्या मागणीला न्याय देणे म्हणजे त्याचे भविष्य आणि समाजातील स्थान देखील निर्धारण करणे आहे

इंग्रजाच्या काळात जे समुदाय आदिवासी होते त्यांना अठराशे शतकात क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं. त्या ट्राईब्सला देशात काश्मीरपासून कन्याकुमार पर्यंत शेड्युल ट्राईब संबोधल गेल. त्यामुळे धनगर एसटी है. आमच्याकडे गाड्या आल्या, चांगले कपडे घालू लागलो तर म्हणे धनगर मागास कसे? सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे एक निकाल दिला आहे. त्यात स्पष्टपणे लिहलंय, अनुसूचित जाती, जमातीत जे येतात त्यांच मागासलेपण तपासण्याची गरज नाही असेही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. धनगर समाजाच्या मागणीला न्याय देणे केवळ समाजाच्या इतिहासाची गरज नाही, तर त्याचे भविष्य आणि समाजातील स्थान देखील निर्धारण करणारे आहे. त्यांना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण देणे हे त्यांचा अधिकार आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीत सुधारणा होईल, आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांचा समावेश होईल असे मतही धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. धनगर समाजाचे जीवनमान आणि त्यांची परंपरा, यांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या समाजाच्या विकासासाठी आरक्षण ही महत्त्वपूर्ण गरज आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आम्ही प्रयत्नरत असणार आहोत.

Continues below advertisement

दिवसेंदिवस धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक

दरम्यान, दिवसेंदिवस धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरताना दिसत आहे. विविध ठिकाणी आंदोलने होत आहे. दिवसेंदिवस धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

धनगरांना फसवणाऱ्यांची घरं जाळा, नेपाळमध्ये जसं झालं त्या पलीकडे घडवा, सदावर्तेंच्या भेटीनंतर आंदोलक बोऱ्हाडेंचा इशारा