Mahayuti Seat Sharing Meeting : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाच्या (Mahayuti Seat Sharing)  घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत अमित शाहांच्या (Amit Shah) भेटीला निघाले आहेत. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) अजित पवार (Ajit Pawar) दाखल झाले आहेत. राज्यातील काही जागाचा तिढा कायम असल्याने अजित पवार सागर बंगल्यावर पोहचले असून, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाहांच्या भेटीनंतर ते महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 


महायुतीमधील जागावाटपाच्या अंतिम बैठका होत असून, दिल्लीत आणि मुंबईत याबाबत बैठकांचा धडाका पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार दाखल झाले आहेत. काही जागांबाबत एकमत झाले नसल्याने यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील सागरवर पोहोचले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईतल्या सर्व खासदार आमदार यांची बैठक बोलावली आहे. त्या आधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. याचवेळी अजित पवार देखील या ठिकाणी पोहचले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार...


राज्यात कधी नव्हे असे राजकीय समीकरण मागील पाच वर्षात पाहायला मिळाले. एकेमकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच  शिवसेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. पुढे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना- भाजप सरकार स्थापन झाले. पण भाजपसोबत पहिल्यांदाच अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्रित सरकारमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. आता मनसे देखील महायुतीत सहभागी होतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


दिल्लीत मोठ्या घडामोडी! मनसे-भाजप युती होणार, राज ठाकरेंची अमित शाहांसोबत खलबतं