औरंगाबाद : महापालिकेच्या कर्मदरिद्रीपणामुळे औरंगाबाद शहरावर उद्यापासून पाणीसंकट ओढावण्याची शक्यता आहे. कारण, वीज बिल थकल्याने महावितरणने महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला आहे.
महापालिकेकडे महावितरणची 12 कोटी 82 लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणने दोन नोटीस आणि एकदा स्मरणपत्र देऊनही महापालिकेने वीज बिल भरलं नाही. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी वीजच उपलब्ध नसल्याने, उद्या शहरात पाणी पुरवठा बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
दुष्काळात पाण्याची टंचाई असल्याने औरंगाबादकरांना पाणी मिळालं नाही. आता शहराला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण ओसंडून वाहिलं असलं तरी महापालिकेच्या चुकीमुळे नागरिकांना पाणी न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप औरंगाबादकरांना पाणी देण्यासाठी काय प्रयत्न करतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबाद महापालिकेचा कर्मदरिद्रीपणा, वीज बिल थकवल्याने 'पाणीबाणी'
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
08 Feb 2018 06:17 PM (IST)
वीज बिल थकल्याने महावितरणने महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -