Balasaheb Thorat : महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्ही कोणीच कुणाला धोका देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांनी केलं. आम्ही सर्व एकत्र येऊन विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे थोरात म्हणाले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी चांगल्या मताधिक्याने जिंकून मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचे थोरात म्हणाले. मंत्री अनिल पाटील यांनी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे विधानसभेत काँग्रेसला धोका देतील असे वक्तव्य केलं होतं. त्यावर थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षण प्रश्न लवकर सुटावा ही अपेक्षा
मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण मंत्रिमंडळ लक्ष घालून आहे. अपेक्षा आहे की हा प्रश्न लवकरच सुटला पाहिजे असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. मराठी शिक्षण हे युवकांना मिळालं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत असंही थोरात म्हणाले. आमचे देखील मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य आहे अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.
खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनता सांगते
खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे जनतेला देखील विचारलं तरी जनता सांगते.सर्व सामान्य माणसाला देखील विचारलं तरी तो सांगू शकतो की खरा पक्ष कोणाचा ही वस्तुस्थिती असल्याचे थोरात म्हणाले. याच्यात फक्त आता सुप्रीम कोर्टाने निर्णय देणे अपेक्षीत असल्याचे थोरात म्हणाले. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर सर्व एकत्र येतील विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवू. तीन विचार तीन पक्ष तीन वेगवेगळे माणसं असल्यामुळेच तीन आहेत, नाहीतर एकच पक्ष राहिला असता. विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व एकत्र येऊन निवडणूक लढवू असे थोरात म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने, विधानसभेला अधिक यश मिळेल
आता देवेंद्र फडणवीस यांनी कारण देऊन काही फायदा नाही. कारण, लोकसभा निवडणुकीत जनमत इंडिया आघाडीच्या बाजूने होतं असे बाळासाहेब थोरात म्हणाले. जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने होती. आता तुम्ही काही कारण सांगितली तरी ती लोकांना पटणार नाहीत असा टोला थोरातांनी फडणवीसांना लगावला. महायुतीचे सरकार ज्या पद्धतीने बनवलं त्यामुळं जनतेमध्ये तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने लोकसभेत आम्हाला चांगले यश मिळालं, त्यापेक्षाही अधिक यश आम्हाला विधानसभेत मिळेल असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ahmednagar MLA List : विखे की थोरात, अहमदनगरमध्ये कुणाचं वर्चस्व? पाहा आमदारांची संपूर्ण यादी