Maharashtra Ahmednagar MLA List : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. जागावाटपासाठी बैठकावर बैठका होतील. दोन ते तीन महिन्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होतील. 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचा (Aamdar) धुरळा उडाला होता. येत्या सप्टेबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होऊ शकतात. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे सर्वांच्याच नजरा असतील. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरने सुजय विखेंना डावलून निलेश लंके (Ahmednagar Lok Sabha Election Result 2024) यांना पसंती दर्शवली. विधानसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये काय होणार? कोणत्या पक्षाला पसंती दिली जाईल.. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.
सहकाराचा बालेकिल्ला म्हणून अहमदनगर जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकारी तत्त्वावर सुरू झालेला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यात आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ असून थोरात आणि विखे यांच्या भोवतीच जिल्ह्याचे राजकारण कायम दिसून आले. 2019 च्या विधानसभा निवडणुका भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढली गेली. मात्र गेल्या दोन वर्षात राज्यात शिवसेनेत दोन गट तर राष्ट्रवादी देखील दोन गट पडले. आज जर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यात सात जागा महायुतीच्या पारड्यात आहेत. तर उर्वरित पाच जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात आहेत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती काय?
अहमदनगर जिल्ह्यातील आमदार: 12 (Ahmednagar Aamdar/MLA List)
विधानसभा मतदारसंघ | आमदाराचे नाव | सध्याचा पक्ष | 2019 मध्ये कुणाचा पराभव |
अकोले | किरण लहामटे | राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार | वैभव पिचड ( भाजप ) |
संगमनेर | बाळासाहेब थोरात | काँग्रेस | साहेबराव नवले ( शिवसेना ) |
शिर्डी | राधाकृष्ण विखे पाटील | भाजप | सुरेश थोरात ( काँग्रेस ) |
कोपरगाव | आशुतोष काळे | राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार | स्नेहलता कोल्हे ( भाजप ) |
श्रीरामपूर | लहू कानडे | काँग्रेस | भाऊसाहेब कांबळे ( शिवसेना ) |
नेवासा | शंकरराव गडाख | क्रांतिकारी पक्ष (ठाकरेंना पाठिंबा) | बाळासाहेब मुरकुटे ( भाजप ) |
शेवगाव | मोनिका राजळे | भाजप | प्रतापराव ढाकणे ( राष्ट्रवादी ) |
राहुरी | प्राजक्त तनपुरे | राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार | शिवाजी कर्डिले ( भाजप ) |
पारनेर | निलेश लंके (सध्या लोकसभा) | राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार | विजयराव औटी ( शिवसेना ) |
अहमदनगर शहर | संग्राम जगताप | राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार | अनिल राठोड ( शिवसेना |
श्रीगोंदा | बबनराव पाचपुते | भाजप | घनश्याम शेलार ( राष्ट्रवादी ) |
कर्जत जामखेड | रोहित पवार | राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार | राम शिंदे ( भाजप ) |
राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील आशुतोष काळे, डॉक्टर किरण लहामटे आणि संग्राम जगताप हे तीन आमदार अजित पवारांसोबत गेले तर रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोन आमदार शरद पवारांसोबत आहेत. शिवसेनेचा एकही आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आला नाही. मात्र निवडणुकीनंतर शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. या वेळच्या लोकसभेचा विचार केला तर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यात मोठी चुरस दिसून येईल.
अहमदनगरचं सोधा राजकारण -
काना वेलांटी मात्रा नसलेला राज्यातील एकमेव जिल्हा म्हणजे अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्याचा राजकारण हे नेहमीच सोधा राजकारण समजलं जातं... सोधा म्हणजेच सोयरे धायरे यांचं राजकारण होय. मात्र बदलती परिस्थिती आणि पक्षात पडलेली फूट या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे. एकीकडे शरद पवार, बाळासाहेब थोरात हे दोन नेते ताकद लावतील तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे यांना पुन्हा एकदा या दोन्ही नेतृत्वाशी संघर्ष करावा लागणार आहे.
आणखी वाचा :
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी