मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या दुपारनंतर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घेतील. तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
सामन्य प्रशासन विभाग शिवसेनेकडे आहे. त्यामुळे उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, तयारीला लागा, असा मेसेज शिवसेनेकडे पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील. मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेला उशीर पाहता कोणतंही खातं रिक्त ठेवू नये, असा मतप्रवाह तिन्ही पक्षांमध्ये आहे. मात्र किती मंत्री शपथ घेतील हे उद्याच स्पष्ट होईल. शिवसेनेकडे असलेलं गृहखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन्ही खात्यांपैकी एक खातंही राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातंही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार का? हे देखील उद्या स्पष्ट होईल.
शिवसेनेची संभाव्य यादी
रामदास कदम
अनिल परब
सुनील प्रभू
दीपक केसरकर
उदय सामंत
तानाजी सावंत
गुलाबराव पाटील
आशिष जैस्वाल
संजय राठोड
सुहास कांदे
काँग्रेसची संभाव्य यादी
अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
यशोमती ठाकूर
सुनील केदार
सतेज पाटील
के सी पाडवी
विश्वजीत कदम
राष्ट्रवादीची संभाव्य यादी
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
नवाब मलिक
राजेश टोपे
अनिल देशमुख
जितेंद्र आव्हाड
संबंधित बातम्या
- महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार 23 किंवा 24 डिसेंबरला? 'या' नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
- मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेस नेते दिल्लीत, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाणांबाबत काय निर्णय होणार?
- समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी; 'ही' नावे चर्चेत
- सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार
- महाविकास आघाडीचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर!