1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने भारतीय मुस्लिमांना धोका नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुस्लिम बांधवांना विश्वास, तर काँग्रेससह ममता बॅनर्जी आणि कम्युनिस्टांवर हल्लाबोल
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, राहुल गांधींचं टीकास्त्र, तर द्वेषाला प्रेमानेच उत्तर देण्याचं नागरिकांना ट्विटरवरुन आवाहन
3. ठाकरे आडनाव लावल्यानं कुणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीचा अप्रत्यक्ष उल्लेख
4. झारखंडमध्ये कुणाची सत्ता येणार, मतमोजणीला सुरुवात, भाजप सत्ता राखणार की काँग्रेस आघाडी विजयी झेंडा रोवणार, याकडे देशाचं लक्ष
5. साताऱ्यातल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के, कराड, पाटण परिसर हादरला, भूकंपाची तीव्रता मोजण्याचं काम सुरु
6. मराठमोळे संगीतकार अजय-अतुलची जोडी फोर्ब्सच्या यादीत, 100 सेलिब्रिटींच्या यादीत अजय-अतुल 22 व्या स्थानी
7. दिल्लीतील इंदिरा विहारमध्ये घराला भीषण आग, 8 नागरिकांचा होरपळून मृत्यू, 5 जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
8. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला अमिताभ बच्चन गैरहजर राहणार, तब्येत ठीक नसल्याने प्रवास न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
9. रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा 22 वर्षांपूर्वीचा विक्रम, रोहितच्या एका वर्षात 47 डावांत सर्वाधिक 2442 धावा
10. कटक वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी सरशी, अखेरच्या वन-डेत टीम इंडियाची विंडीजवर 4 विकेट्सनी मात