नवी दिल्ली : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस नेत्यांची दिल्ली हायकमांडसोबत प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याशी चर्चा केला आहे. मात्र सोनिया गांधी यांची भेट होण्याची शक्यता कमी आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना जागा मिळणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे. अशोक चव्हाण यांचा मंत्रिमडळात समावेश होण्याची शक्यता आहे, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत अजूनही शंका आहे. मंत्रिमंडळ विस्तारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते रविवारी दिल्लीत दाखल झाले.


काँग्रेसची संभाव्य मंत्रिमंडळाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. कारण अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उर्जा खात्यासाठी उत्सुक आहेत. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतंही मोठं खात शिल्लक राहत नसल्याने त्यांना कमी महत्त्वाचं खातं देण्यास हायकमांड उत्सुक नसल्याची माहिती मिळत आहे.


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर या सहा मंत्र्यांकडे हिवाळी अधिवेशनासाठी विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र या वर्षअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या 7 ते 8 जणांची वर्णी लागू शकते.


काँग्रेसचं तात्पुरतं खातेवाटप


बाळासाहेब थोरात - महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय


नितीन राऊत - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष


काँग्रेसची संभाव्य यादी


अशोक चव्हाण 
पृथ्वीराज चव्हाण 
विजय वडेट्टीवार
वर्षा गायकवाड
यशोमती ठाकूर 
सुनील केदार
सतेज पाटील
के सी पाडवी
विश्वजीत कदम


संबंधित बातम्या




VIDEO | राज्यभरातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | बातम्या सुपरफास्ट