काल दिवसभरात पार पडलेल्या तीन बैठका आणि तब्बल चार तासांच्या खलबतानंतर महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटप आज होणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस नेते प्रमुख खात्यांसाठी आग्रही आहेत. त्यावरुन मागणी योग्य असली तरी तुटेपर्यंत ताणू नये, असा सूचना वजा सल्लाच अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे. उद्यापर्यंत सगळं खातेवाटप अगदी पालकमंत्री पदांसहीत जाहीर होण्याची शक्यता आहे असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच कोणत्याही कुरबुरी, तक्रार, वाद आमच्यात नाही. कोणत्याही तथ्यहीन आणि आधार नसलेल्या चर्चांवर, अफवांवर विश्वास ठेवू नका असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच खातेवाटपाची यादी तयार आहे, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप होईल असा दावा अजितदादांनी केलाय. खाते वाटपात कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केलाय.
पाहा व्हिडीओ : खातेवाटप उद्या जाहीर होण्याची शक्यता : अजित पवार
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील संभाव्य खातेवाटपाची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. संभाव्य खातेवाटपात कुणाला कोणती खुर्ची मिळणार पाहूयात...
संभाव्य खातेवाटप राष्ट्रवादी
- अनिल देशमुख - गृह खातं
- अजित पवार - अर्थ आणि नियोजन
- जंयत पाटील - जलसंपदा
- दिलीप वळसे पाटील - कौशल्य विकास आणि कामगार
- जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
- नवाब मलिक - अल्पसंख्याक
- हसन मुश्रीफ - सहकार
- धनंजय मुंडे - सामाजिक न्याय
संभाव्य खातेवाटप काँग्रेस
- बाळासाहेब थोरात- महसूल खात
- अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
संभाव्य खातेवाटप शिवसेना
- एकनाथ शिंदे - नगरविकास / सार्वजनिक बांधकाम
- सुभाष देसाई - उद्योग आणि खनिकर्म
- अनिल परब - सीएमओ
- आदित्य ठाकरे - पर्यावरण / उच्च व तंत्रशिक्षण
- उदय सामंत - परिवहन
संबंधित बातम्या :
खातेवाटप निश्चित, उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होणार : अजित पवार
अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, बच्चू कडूंचा इशारा