kirit somaiya on sanjay raut :   संजय राऊत (sanjay raut) यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्या (BJP kirit somaiya) यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी पोलिसात तक्रार करावी, पुरावे द्यावेत तसेच बारामती अॅग्रोवनने घेतलेल्या कर्ज आणि रवींद्र वायकरांसह ज्यांनी हॉटेलसाठी जमीन घोटाळा केला त्या सर्वांची चौकशी होणार असल्याचे सोमय्या म्हणाले.


संजय राऊत यांच्यामध्ये जर हिम्मत असेल  तर त्यांनी पोलीस स्टेशनला जावं. न्यायालयात जावं आणि किरीट सोमय्याने विक्रांतमध्ये दमडीचा जर घोटाळा केला असेल तर त्यांनी कागदपत्रे द्यावीत. अर्धा डझन वेळेला उद्धव ठाकरे,ठाकरे सरकार,संजय राऊत तक्रारदारांना न्यायालयाने पोलिसांनी सांगितलं, 57 कोटींचा आरोप एफ आय आर केला, पण 57 पैशाचाही अपव्यवहार झालेला दिसत नाही आणि तुम्ही काय त्याचे पेपर्स देत नाहीत. शेवटी उच्च न्यायालयाने पोलिसांना ठणकावलं. ठाकरे सरकारला सांगितलं की किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्या विरोधात कोणतेही कारवाई करता येणार नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा उठला


संजय राऊत यांच्या परिवाराच्या खात्यात कोविडचे, खिचडी घोटाळ्याचे पैसे आले, कोविड हॉस्पिटलच्या घोटाळ्याचे पैसे आले, पत्राचाळ घोटाळ्याचे पैसे आले. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने बोलावलं आहे, मुलीच्या खात्यात पैसे गेले आहेत मग ते वाचणार का?  वास्तविकरित्या संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळा उठला आहे. रवींद्र वायकर ईडी कार्यालयात पोहोचले आहेत, रवींद्र वायकर ला 500 कोटींचा बेकायदेशीर हॉटेल घोटाळ्याची परवानगी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं म्हणून दिली गेली आहे, म्हणून भीती उद्धव ठाकरे यांना वाटते, असे किरीट सोमय्या म्हणाले. 


अगला नंबर किसका?


वायकर यांच्या 500 कोटी हॉटेल घोटाळा आला, त्यांना परवानगी कोणी दिली? महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी ना? इकबाल चहल यांनी कोणाच्या सांगण्यावरून दिली, हाजीर तो होना ही पडेगा? असो सोमय्या म्हणाले. किशोरी पेडणेकर यांनी कोविड कफन विकलं, असेही सोमय्या म्हणाले. 



रोहित पवारांवर टीका - 


 रोहित पवार यांच्याबद्दल संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारायला हवं. बारामती ॲग्रो साखर बनवते की बासमती विकण्याचा धंदा करते. बारामती ॲग्रोवन एक कन्नड सहकारी कारखाना घेतला, त्या कारखान्यात साखरेचा किती उत्पादन झालं आणि कर्ज किती घेतलं? तांझानिया, सिंगापूर फॉरेन रजिस्ट्रेशन काय काय उद्योग धंदे केलेत. रोहित पवार,सुप्रिया ताई सुळे यांनी उत्तर द्यावं, असे सोमय्या म्हणाले.