Mumbai Traffic Update: मुंबईकरांनो! सांताक्रूझ, पश्चिम द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण मुंबई वाहतूक पोलिसांकडून  प्रवाशांना

  3 ऑगस्ट म्हणजेच आज वाहतुकी संदर्भात सतर्क करण्यात आले आहे, यासंदर्भातील ट्वीट वाहतूक पोलिसांनी केलं आहे.  बुधवारी सकाळी 10.30 ते 11.30 आणि दुपारी 12.30 ते 6 या वेळेत नियोजित अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या पूर्वनियोजित भेटीमुळे सांताक्रूझ विमानतळ, पश्चिम द्रुतगती मार्ग ते मलबार हिल, तसेच मलबार हिल ते रिगल सर्कल या भागाच वाहतूक संथ राहील. नागरिकांनी यानुसार प्रवासाचे नियोजन करावे अशी विनंती वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. 


 






ट्राफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांसाठी


 मुंबई पोलिसांनी वाहतूक शाखेचं नवीन ट्विटर हॅण्डल लॉंच केल्यामुळे याचा फायदा हा दररोज मुंबईतल्या ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या मुंबईकरांना होत आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतुकीसंदर्भात नागरिकांना माहिती दिली जाते. तसेच याच्या माध्यमातून मुंबईकरांना वाहतूकीसंबंधी तक्रारी आणि सूचनाही करता येत आहे. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीसाठी हा एक रामबाण उपाय असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर मुंबईकरांसाठी काही महत्वाच्या टिप्सही ट्विट करत असतात.