Maharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उद्या झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत.  


कोरोनासंकट आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्रातील 6 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, पालघर आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. आज मतदान तर आज मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरूवात होईल. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्व ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.


नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक


नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विखुरलेल्या 1 हजार 115 मतदान केंद्रांवर आज 6 लाख 96 हजार पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावून ग्रामीण भागातील जनतेचा कौल कोणाला हे स्पष्ट करणार आहे. आज होणार्‍या या पोटनिवडणुकीसाठी आज नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तहसील कार्यालयातून पोलींग पार्टीज रवाना होत आहेत. नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी केली असली, तरी शिवसेनेने वेगळी चूल मांडत अकरा ठिकाणी उमेदवार उभे केल्याने बहुतांशी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. काही ठिकाणी दमदार बंडखोरांनी निवडणूक बहुरंगी ही बनवली आहे.. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अनेक सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून आपले बहुमत पुन्हा साध्य करण्याचे आवाहन काँग्रेस समोर आहे.. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपसमोर या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आपली सदस्य संख्या वाढवण्याचे आव्हान आहे.


धुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना शहरातील केंद्रीय विद्यालय या जवळील धान्य गोडाऊन येथे साहित्याचे वाटप करण्यात आले, धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन नियोजन करण्यात आले आहे, धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गटांसाठी 42 तर 28 गणांसाठी 72 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला आहे.


पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणूक


पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा काल पासून थंडावल्या उद्या जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे . ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागा रद्द झाल्या असून याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी ला बसलेला पाहायला मिळाला . राष्ट्रवादी च्या 15 पैकी 7 जागा रद्द झाल्या असून शिवसेना 3 , भाजप 4 तर माकपची एक जागा रद्द झाली होती . जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडी सत्तेत असून शिवसेने कडे अध्यक्ष तर राष्ट्रवादी कडे उपाध्यक्ष पद आहे . जिल्हा परिषदेत एकूण 57 जागा असून बहुमतासाठी 29 जागांची गरज आहे. या पोटनिवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जागा कमी जास्त झाले तरी जिल्हा परिषदेतील सत्तेत फरक पडणार नसला तरी महाविकास आघाडीत फूट पडल्यास येथे सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मागे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेकडे 18 , राष्ट्रवादी काँग्रेस 15 , भाजपक 10 , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 6 , बहुजन विकास आघाडी 4 अपक्ष 3 तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळवण्यात यश आलं होतं . मात्र सध्याच्या पोटनिवडणुकीत बहुतांशी जागांवर सेना भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.   या पोटनिवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांची! खासदारांच्या हट्टापायी जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील वणई गटाचा शिवसेनेचा सिटिंग उमेदवार डावलून खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांना उमेदवारी दिली आहे,,त्यामूळे या गटातील शिवसैनिकां मध्ये नाराजीचा सुर आहे.तर भापज,सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस अशी अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे जर का खासदार गावित यांच्या चिरंजीवाला येथे चुकून पराभव स्वीकारावा लागला तर त्याचे परिणाम थेट खासदार गावित यांच्या पुढील कारकीर्दीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


वाशिम जि.प. च्या 14 आणि पं.स.च्या 27 जागांसाठी आज मतदान!  


वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी  पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. वाशीम जिल्हा  प्रशासन  सज्ज झालं आहे. सगळ्या मतदान केंद्रावर  जाण्यासाठी कर्मचारी मत यंत्र आणि इतर साहित्य घेऊन  कर्मचारी रवाना होत आहेतय  मात्र कोरोनाचा धोका  लक्षात घेता सगळ्या कर्मचाऱ्याच्या  RTPCR टेस्ट केल्या  जात आहे   वाशिम जिल्हा परिषदेचे 52 गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या 104 गणांसाठी 7 जानेवारी 2020 रोजी निवडणूक झाली होती. ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे 14 गट आणि पंचायत समित्यांच्या 27 जागेसाठी 5 ऑक्टोंबर  रोजी पोटनिवडणूक होत आहे. जि.प.च्या १४ गटांसाठी ८२ तर पंचायत समितीच्या २७ गणांत एकूण १३५ उमेदवारांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.  


अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी  संपुर्ण तयारी


अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाची यासाठी संपुर्ण तयारी झाली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होताये. 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.  अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या 14 जागांसाठी मतदान होत आहेय. तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी मतदान होत आहे. आज सातही तालुक्यातून पोलींग पार्टीज मतदान केंद्रावर रवाना झाल्या आहेत. अकोला जिल्हा परिषदेवर सध्या वंचित बहुजन आघाडीची सभा आहेय. अपात्र 14 पैकी 8 सदस्य वंचितचे आहेय. या परिस्थितीत आपली सत्ता राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी संघर्ष करतांना दिसतेय. अकोला जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी वंचित, भाजप, प्रहार आणि काँग्रेस स्वबळावर लढतेय. तर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून लढतेय. जिल्हा परिषदसाठी 68 तर पंचायत समितीसाठी 119 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेय. जिल्हा प्रशासन संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झालंय. 


सध्याच्या जागा : 39


वंचित बहूजन आघाडी : 16
शिवसेना : 12
भाजप : 04 
काँग्रेस : 03
राष्ट्रवादी : 02
अपक्ष : 02    


किती ठिकाणी होणार मतदान आणि मतमोजणी


पालघर


किती तालुक्यात : 7/8
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 7
पालघर डहाणू तलासरी विक्रमगड वाडा वसई आणि मोखाडा


धुळे


किती तालुक्यात : 4/6
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 4


धुळे, साक्री, शिरपूर, सिंदखेडा


नंदुरबार


किती तालुक्यात : 3/6
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 3 
नंदुरबार, शहादा , अक्कलकुवा


अकोला


किती तालुक्यात : 7/7 
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 7 
अकोला, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर , अकोट, तेल्हारा, बाळापूर , पातूर


वाशिम


किती तालुक्यात : 6/6 
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 6 
वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपिर, कारंजा, मानोरा


नागपूर


किती तालुक्यात : 10/14
मतमोजणी किती ठिकाणी आहे : 10 
नागपूर, परशिवनी, रामटेक, सावनेर, हिंगणा, मौदा, कुही, काटोल, नरखेड, कामठी