Unseasonal Rain Warning in Maharashtra : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह (Mumbai News) परिसरातील कमाल तापमानात पाच अंशाने वाढ झाली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सौम्य थंडी (Maharashtra Weather Update)  जाणवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD)  वर्तवली आहे. तर बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low Pressure Area) मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra News) मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा दिला आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात थंडीची लाट 2 फेब्रुवारीपर्यंत  कायम राहणार आहे. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं होत.  पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु, दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. 


मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता   (Unseasonal Rain) 


राज्यातील मराठवाडा (Marathwada)  आणि विदर्भात (Vidharbha) हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस आला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे खांडबारा आठवडे बाजारात धावपळ झाली आहे. 


बदलत्या हवामानाचा रब्बी पिकांना फटका


राज्यात सातत्यानं तापमानात चढ उतार होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) परिणाम होत आहे. बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा (Karpa) प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच गहू (Wheat), हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.